Nandurbar News : येथे जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चातून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. मात्र ग्रामपंचायतीला विश्वासात न घेतल्याने या दिशाहीन कामात अनेक त्रुटी आहेत.
मनमानी करणाऱ्या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव येथील ग्रामसभेत करण्यात आला.
ग्रामसचिवालयात नुकतीच ग्रामसभा झाली. (Resolution of Prakasha Gram Sabha to cancel contract of arbitrary contractors in jal jeevan mission nandurbar news)
ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील यांनी अहवालवाचन केले. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. घरकुल योजनेतील वंचितांचा यादीत समावेश करून योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. महसूल, कृषी आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामसभेत देण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणात केंद्राच्या जलजीवन मिशन योजनेतून प्रकाशा येथे तीन कोटी ७८ लाखांच्या खर्चातून नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरवात झाली. या कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. हीना गावित, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित आदींच्या हस्ते झाले.
पाण्याच्या स्त्रोत गोमाई नदी आहे. गाव उंच सखल भागावर आहे. अशुद्ध उर्ध्ववाहिनी, शुद्ध-अशुद्ध पंपिंग सेट, वितरण व्यवस्था असे एकूण २३.०५ किलोमीटर काम करण्यासोबतच, उंच जागेवर एक लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधणे आदी कामे निविदेनुसार करावयाची आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ठेकेदाराने ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने पटेल त्याजागी काँक्रिट तोडून नवीन जलवाहिन्या टाकल्या. त्या अनेक ठिकाणी भूमिगत केलेल्या नाहीत. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. पर्यायाने ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या या कामाचा ठेका रद्द करण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला.
जलजीवन मिशनअंतर्गत सर्वत्र पाणीपुरवठ्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. पुढील ३० वर्षासाठीचे हे नियोजन आहे. त्यासाठी गावाची लोकसंख्येनुसार प्रतिमानसी दिवसाला ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रकाशा गावाची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार दहा हजार १३३ आहे. मात्र या यंत्रणेने केलेल्या नविन संशोधनात आठ हजार ५४५ गावाची लोकसंख्या निश्चित केली आहे.
सरपंच राजनंदनी भिल अध्यक्षस्थानी होत्या. उपसरपंच हेमलता पाटील, भरत पाटील, रफिक खाटीक, रवींद्र भिल, अरुण भिल, प्रकाश ठाकरे, सुदाम ठाकरे, अमृत ठाकरे, राहुल ब्राह्मणी, तलाठी धर्मराज चौधरी, कृषी सहाय्यक खेडकर, मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी, वीज वितरण कर्मचारी, पशुवैद्यकीय केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशासोविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.