Dhule News : बाजारापेक्षा किरकोळ विक्रीत भाव खातेय भुईमूग शेंग

Kapdane : Legumes made available for retail sale by Hiralal Borse.
Kapdane : Legumes made available for retail sale by Hiralal Borse.esakal
Updated on

Dhule News : बागायती उन्हाळी हंगाम संपला आहे. या वर्षी उन्हाळी बाजरी, मका आणि भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. बाजरी आणि मक्याचे भाव कमी झाले आहेत.

आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनीच भाव पाडले आहेत. दुसरीकडे भुईमुग शेंग मात्र चांगलीच भाव खात आहे. किरकोळ विक्री प्रतिक्विंटल सात हजारांपासून साडेसात हजारांपर्यंत पोचली आहे.

सलग तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण विक्रमी आहे. धुळे, साक्री आणि शिरपूर तालुक्यातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात उंचावली आहे. (Retail sales than in market rate hike groundnut pods Dhule News )

रब्बी आणि उन्हाळी बागायतीचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. उन्हाळ्यातही मजूर मिळणे कठीण झाले आहे. सध्या उन्हाळी मका, बाजरी आणि भुईमूग आवरण्याचा हंगाम पूर्णत्वास आला आहे. बाजारात मका, बाजरी आणि भुईमुगाची आवक मोठी वाढली आहे.

आवक वाढल्याने मक्याचे भाव एक हजार ७०० पर्यंत आले आहेत. बाजरी तीन हजारांवरून दोन हजार ५०० पर्यंत आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भुईमूग शेंगांची आवक दोंडाईचा बाजारात अधिक झाली अन् व्यापाऱ्यांनी भाव पाडण्याचा प्रकारही झाला. धुळे बाजारातही भाव कमीच आहे. काही शेतकऱ्यांनी गावातच शेंग विक्रीस सुरवात केली. प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये अशी विक्री होत आहे.

"बाजारात शेतमालाचे भाव पाडणे नित्याचे आहे. गावातील शेतमाल गावातच विक्री करणार आहे. मालाचा दर्जा चांगलाच राहील."

-हिरालाल बोरसे, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.