Dhule Teacher Protest : सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेसाठी मनपाच्या निवृत्त प्राथमिक शिक्षकांनी मनपा प्रवेशद्वारावर गुरुवारी (ता. २८) डफ वाजवित ‘आवाज सुनो’ आंदोलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत रोज सकाळी हे आंदोलन केले जाईल, अशा इशाराही आंदोलकांनी दिला.
महापालिकेच्या निवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के थकीत फरकाच्या रकमा मिळाल्या नाहीत. (Retired primary teachers of municipality staged Awaaz Suno protest at municipality by playing tambourine dhule news)
तसेच जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंतच्या सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के रक्कमा मनपाने अदा केल्या नाहीत. मनपाकडे निवृत्त शिक्षकांची ५० टक्के हिश्याची २ कोटी २२ लाख ५० हजार रूपये थकबाकी आहे.
या रकमेसाठी निवृत्त शिक्षक, शिक्षकांनी अखिल महापालिका निवृत्त शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारपासून रोज सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत डफ वाजून आंदोलन सुरु केले आहे. यात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस मधुकर वाणी आदींसह निवृत्त शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
निवृत्त शिक्षकांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पाठिंबा दिला. प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, शहर-जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर यांनी निवृत्त शिक्षकांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. माजी नगरसेवक उमेश महाले, संजय जगताप, नरेंद्र अहिरे, सुरेश अहिरे, ज्ञानेश्वर पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.