Dhule News : शहरातील मालमत्ताधारकांना करयोग्य मूल्य निश्चितीच्या अर्थात सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरू झाली आहे.
दरम्यान, या नोटिसा मिळाल्यानंतर बहुतांश मालमत्ताधारकांकडून वाढीव कर आकारणी झाल्याच्या तक्रारी होत आहेत.
संबंधित मालमत्ताधारक त्याबाबत हरकती नोंदवत असून, गेल्या दहा दिवसांतच सुमारे दोन हजार हरकती दाखल झाल्या आहेत. (Revised property taxation procedures Hearing on objections from 29 May Objections evidence required Two thousand objections filed in ten days Dhule News)
धुळे महापालिकेतर्फे हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण धुळे शहरातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण, मोजमाप झाल्यानंतर मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणी करण्यात येत आहे. प्रथम हद्दवाढ क्षेत्रात ही प्रक्रिया करण्यात आली.
त्यानुसार या वर्षी मालमत्ताधारकांना सुधारित मालमत्ता करानुसार बिले वाटप सुरू झाले आहे.
दरम्यान, उर्वरित शहरातील सुमारे ८८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून प्रथमतः शहराच्या देवपूर भागातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या अनुषंगाने करयोग्य मूल्य निश्चितीच्या नोटिसा देण्याचे काम सुरू आहे.
या नोटिसांवर संबंधित मालमत्ताधारकांच्या हरकती असतील तर त्यांनी याद्या प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांत घेणे आवश्यक आहे.
दोन हजार हरकती प्राप्त
११ मेपासून मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू झाली. दरम्यान, महापालिकेकडून वाढीव, अवास्तव कर आकारणी केल्याच्या तक्रारी होत आहेत. मालमत्तांचे मोजमाप लेसर गनद्वारे झाल्याने ते बेकायदा, सदोष व चुकीचे असल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत.
याप्रश्नी काही राजकीय पक्षांनीही महापालिकेकडून वाढीव कर आकारणी बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत जास्तीत जास्त नागरिकांनी लेखा हरकती दाखल करण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांत सुमारे दोन हजार हरकती दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२९ मेपासून सुनावणी
दाखल हरकतींवर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २९ मेपासून सुरू होणार आहे.
हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. देवपूर भाग, साक्री रोड, पेठ भाग व चाळीसगाव रोड परिसर अशा चार भागांनुसार सुनावणीची ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
मोघम तक्रारींना अर्थ नाही
मालमत्ता करवाढीबाबत बहुतांश मालमत्ताधारकांकडून मोघम तक्रारींच्या स्वरूपात हरकती दाखल केल्या जातात. त्यामुळे सुनावणीदरम्यान या हरकती निकाली निघतात. त्यामुळे पुराव्यासकट व नियमानुसार हरकती दाखल होणे आवश्यक आहे.
प्राप्त हरकतींची स्थिती अशी
११ मे...१८
१२ मे...२०
१५ मे...९२
१६ मे...१११
१७ मे...१२६
१८ मे...२१६
१९ मे...२८५
े२२ मे...५३९
२३ मे...५३६
एकूण...१९४२
नोटीस देताना स्वाक्षरी
नागरिकांना अंधारात ठेवून मालमत्ता करवाढ करण्यात आली. नागरिकांच्या घरांमध्ये नोटिसा फेकून दिल्या जात असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांकडून झाला आहे. मात्र, करयोग्य मूल्यनिश्चितीच्या नोटिसा महापालिकेचे कर्मचारी वाटप करत आहेत.
या नोटिसा देताना कर्मचारी नोटीस मिळाल्याबाबत संबंधितांच्या स्वाक्षरी घेत आहेत. स्वाक्षरी घेणे बंधनकारक असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.