Dhule News : दोन दिवसात 640 हरकतींवर सुनावणी

Dhule: Officials hearing the objections received regarding revised taxation in the Municipal Corporation.
Dhule: Officials hearing the objections received regarding revised taxation in the Municipal Corporation.esakal
Updated on

Dhule News : शहरातील मालमत्तांना सुधारित कर आकारणीच्या अनुषंगाने मालमत्ताधारकांनी घेतलेल्या हरकतींवर महापालिकेत सुनावणी सुरू झाली.

सुनावणीच्या दोन दिवसांत एकूण ८०० पैकी ६४० हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, ज्या हरकतींमध्ये तथ्य आढळून आले अशा मालमत्तांच्या ठिकाणी स्पॉट व्हीजीट करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

उर्वरित बहुतांश हरकतींमध्ये तथ्य नसल्याने त्या निकाली काढण्यात आल्या. (Revised taxation procedures Spot visit will be done on 100 properties, rest will be settled Hearing on 640 objections in two days Dhule News)

धुळे महापालिका हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करून मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया महापालिकेतर्फे सुरू आहे. प्रथम टप्प्यात हद्दवाढ क्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या ११ गावांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

त्यानंतर उर्वरित शहरात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात शहराच्या देवपूर भागातील मालमत्ताधारकांना करयोग्य मूल्य निश्‍चितीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिसांवर हरकती मागविण्यात आल्या.

Dhule: Officials hearing the objections received regarding revised taxation in the Municipal Corporation.
Farmer News : शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण; राधाकृष्ण विखे पाटील

मुदतीअंती महापालिकेकडे एकूण चार हजार हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर २९ मेपासून सुनावणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात हरकतींवर सुनावणीची ही प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त विजय सनेर, करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट आदी सुनावणी घेत आहेत.

वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, शिरीष जाधव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी त्यांना सहकार्य करत आहेत. सुनावणीच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. २९) चारशे हरकतदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते.

त्यातील ३११ हरकतदार सुनावणीला हजर राहिले, तर ८९ हरकतदार गैरहजर होते. मंगळवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशी ३२९ हरकतींवर सुनावणी झाली. दरम्यान, सध्या रोज ४०० हरकतदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येत आहे. हे नियोजन रोज ६०० हरकतींच्या सुनावणीपर्यंत वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule: Officials hearing the objections received regarding revised taxation in the Municipal Corporation.
Agriculture News : भाताची 29 हजार हेक्टरवर होणार लागवड; खते, बियाण्यांच्या उपलब्धतेची तयारी

केवळ तक्रारींचा पाऊस

सुधारित कर आकारणीच्या नोटिसा मिळाल्यानंतर संबंधित कर आकारणीबाबत ठोस आक्षेप असणाऱ्या हरकती पुराव्यासह सादर होणे आवश्‍यक आहे. यात काही नागरिकांकडून पुराव्यासह हरकती दाखलही होतात.

मात्र, याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश हरकतींना केवळ तक्रारींचे स्वरूप असते. त्यामुळे अशा हरकती निकाली निघतात. हद्दवाढ क्षेत्रातील हरकतींबाबतही असाच प्रकार झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्राप्त चार हजारपैकी किती हरकतदारांचा कर कमी होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दोन दिवसातील कार्यवाही अशी

* २९ मे : हजर- ३११, गैरहजर- ८९, स्पॉट व्हिजीट- ५८

* ३० मे : हजर- ३२९, गैरहजर- ७१, स्पॉट व्हिजीट- ४५

* एकूण हरकतींवर सुनावणी- ६४०, गैरहजर- १६०, स्पॉट व्हिजीट- १०३.

Dhule: Officials hearing the objections received regarding revised taxation in the Municipal Corporation.
Farmer News : शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण; राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.