: येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयात शनिवारी इकोफ्रेंडली गणपती स्पर्धा घेण्यात आली. त्यात मुस्लिम विद्यार्थी रिजवान राजू पिंजारी यानेही गणपतीची सुंदर मूर्ती बनवून समाजात सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. (Rizwan Pinjari gave message of pantheism Eco Friendly Ganesha Competition at Kasaret Multi Purpose School Dhule)
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गणेशमूर्ती बनविण्याच्या इकोफ्रेंडली स्पर्धेत मुस्लिम समाजाचा विद्यार्थी रिजवान नामक छोट्याशा मुलाने स्वतःहून सहभाग घेतला. त्याच्या सहभागात निरागसता असल्याने त्याच्या रूपाने जणू जाती व धर्मभेद करणाऱ्यांना हा सर्वधर्मसमभावाचा तो संदेश देत आहे.
समाजातील काही घटक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. रिजवानसारखे निरागस बालक अशा कौतुकास्पद कृतीतून औपचारिक आणि समाजात एकोप्याने व स्नेहपूर्वक राहण्याचा संदेश देतात.
योगायोगाने संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील, सचिव ॲड. एस. जे. भामरे (औरंगाबाद खंड न्यायालय विधिज्ञ) व विश्वस्त तथा शालेय समिती अध्यक्ष संजय देसले यांनी अचानक विद्यालयास भेट दिली असता त्यांना स्पर्धेविषयी माहिती दिली असता त्यांनी रिजवानला रोख रक्कम बक्षीस दिले.
विज्ञान मेळाव्यात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करिना भामरे हिला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी कासारेच्या बाजारपेठेत हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत अस्खलित हिंदी राष्ट्रभाषेत चारुशीला तोरवणे या विद्यार्थिनीने भाषण दिले असता प्रचंड टाळ्या व रोख बक्षिसे मिळविली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तिलाही कौतुकाची थाप म्हणून विश्वस्तांनी रोख रक्कम बक्षीस दिली. इकोफ्रेंडली गणपती स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असता रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत निवडक गणपती मांडण्यात आले होते.
ज्येष्ठ शिक्षक व्ही. जी. बागूल व सौ. आर. एस. भदाणे यांनी परीक्षण केले. स्पर्धेचे संयोजन मुख्याध्यापक ए. एन. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. देसले, बाळकृष्ण तोरवणे, तुषार सोनवणे, कविता देसले, विकास शिंदे, कविता ठाकरे, संजय गांगुर्डे यांनी परीक्षण केले.
स्पर्धेतील विजेते ः
पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी दोन गटांत स्पर्धा झाली. लहान गट : प्रथम- राजनंदिनी ठाकरे, द्वितीय- मानवी जाधव, तृतीय- रिजवान पिंजारी. मोठा गट : प्रथम- सार्थक तोरवणे, द्वितीय- यश कुवर, तृतीय- रविना चित्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.