Dhule Crime News : सॉ-मिलमध्ये थरार; साडेसोळा लाखांवर रोकड, दागिन्यांची लूट

Robbers looted 16 lakh rupees in dhule crime news
Robbers looted 16 lakh rupees in dhule crime newsesakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील पारोळा रोडवरील कॉटन मार्केटशेजारील पंजाबी सॉ-मिलमध्ये रविवारी (ता. २) मध्यरात्रीनंतर अडीचला चार अहिराणी व एका हिंदी भाषिक मिळून पाच दरोडेखोरांनी धिंगाणा घातला.

पिस्तूल, चॉपर, सळईसारख्या शस्त्रांनी पंजाबी कुटुंबाला धमकावत सरासरी साडेआठ लाखांची रोकड आणि उर्वरित हिरे, सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण १६ लाख १७ हजार पाचशे रुपयांची लूट दरोडेखोरांनी केली. या घटनेच्या आव्हानामुळे पोलिस यंत्रणेने तपासाला गती दिली आहे. (Robbers looted 16 lakh rupees in dhule crime news)

या प्रकरणी पंजाबी सॉ-मिलचे मालक विनोद रामस्वरूप भसीन (वय ६६) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे सॉ-मिलमध्ये दुमजली घर आहे. या ठिकाणी चार मजूर कामास आहेत. दर रविवारी सॉ-मिल बंद असते. त्यांचा मुलगा विशाल, त्याची पत्नी, नात, नातू, वरच्या मजल्यावर दोन चुलतभाऊ कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

रविवारी रात्री साडेदहाला कुलपे लावत भसीन परिवार झोपी गेला. मध्यरात्री अडीचला घरात कुणीतरी शिरल्याचे फिर्यादी भसीन यांना जाणवले. त्यांनी सीसीटीव्हीतून पाहणी केली. त्याच वेळी चेहऱ्यावर मास्क व डोक्याला स्कार्प लावलेला दरोडेखोर पिस्तूल घेऊन फिर्यादी भसीन यांच्याजवळ गेला. त्यांच्या डोक्याला त्याने पिस्तूल लावले.

पाच दरोडेखोरांचे कृत्य

पाठोपाठ दुसरा दरोडेखोर आला. त्याने फिर्यादीच्या पोटाला चॉपर लावला. नंतर सळई व धारधार शस्त्रे घेत आणखी तीन दरोडेखोर आले. ‘चिल्लाने का नहीं, नहीं तो मार डालूंगा, माल कहा रखा है, उसकी चाबी दे’ असे फिर्यादीला धमकावत दरोडेखोरांनी मोबाईल हिसकावत त्यांच्या चेहऱ्यावर बुक्के मारले. त्यामुळे फिर्यादीच्या डोळ्याला इजा झाली. दरोडेखोरांनी या धाकातून चाव्या घेतल्या आणि कपाट, तिजोरीतील हिरे, सोन्या-चांदीचे दागिने, रोकडची लूट केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Robbers looted 16 lakh rupees in dhule crime news
Dhule Crime News : धुळ्यात एकाच रात्रीत 4 घरफोड्या; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दरोडेखोर स्थानिक?

दरोडेखोर मध्यम व सडपातळ बांध्याचे, सरासरी १६४ ते १७२ सेंटिमीटर उंचीचे होते. त्यांनी डोके, चेहऱ्यावर लाल, पिवळे, तपकिरी रंगाचे डिझाइन असलेले स्कार्फ घातले होते. एक हिंदीत, तर चौघे दरोडेखोर अहिराणीत बोलत होते. त्यांनी लुटीपूर्वी फिर्यादीच्या सुनेस घराच्या एका मागील खोलीत कोंडले.

नंतर ते पसार झाले. दरोडेखोर स्थानिक किंवा जिल्हा परिसरातील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या घटनेच्या आव्हानामुळे आझादनगर आणि एलसीबीने तपासास गती दिली आहे. त्यांनी अनेक गुन्हेगारांची चौकशी सुरू केली आहे.

बारकुंड घटनास्थळी

घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगरचे निरीक्षक नितीन देशमुख, श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानाने फिर्यादीच्या घरामागील बडगुजर प्लॉटजवळील नाल्यापर्यंतचा माग काढला.

पोलिसांनी तपासाला सुरवात करत असतानाच त्यांच्या हाती दहा ग्रॅमचे सोन्याचे नाणे लागले. ते दरोडेखोरांच्या हातून निसटले असावे. रेकी केल्यानंतर त्यांनी शालेय बँगेतून लुटीचा ऐवज नेल्याचा संशय आहे.

Robbers looted 16 lakh rupees in dhule crime news
Dhule Crime: मोबाईल, मुद्देमालासह संशयितास अटक; मोबाईलची ओळख पटविण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()