Dhule News : जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी २३ नोव्हेंबरला सकाळी दहा ते दुपारी दोनदरम्यान धुळ्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली.(Rojgar Melava on Thursday dhule news)
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) यांच्यामार्फत प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे हा रोजगार मेळावा होईल.
यासाठी डाटामेट्रिक लिमिटेड (नाशिक), एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड (अहमदनगर), भारतीय आयुर्विमा कंपनी (एलआयसी) (धुळे), रिलायन्स निप्पॉन लाइफ विमा कंपनी (धुळे) या कंपनीतील विविध पदांसाठी ६०० रिक्त पदे प्राप्त झाली आहेत.
याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिनमधून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटणावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्रॉइव्ह-११ पर्याय (२०२३-२०२४) धुळे यांची निवड करावी.
उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदीप बोरसे (मो. ९८२२२९९८४४ तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे (मो. ८६००३०३४८७) यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.