Dhule Crime News : महिन्यापासून बंद घरात कुजलेला मृतदेह; तर्कवितर्कांना उधाण

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये गेल्या महिनाभरापासून बंद असलेले घर उघडल्यानंतर घरात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृतदेह बंद घरात आलाच कसा, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

दरम्यान, चोरीच्या उद्देशाने चोरटा घरात शिरला असावा व जिन्यावरून पडून अथवा विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असावा असाही एक तर्क लावण्यात येत आहे. (rotting body found in closed house for month dhule crime news)

धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये चंपावती काशीनाथ तारगे या वृद्ध महिलेचे घर आहे. बहिणीच्या नातवाच्या लग्नासाठी त्या महिनाभरापूर्वी इगतपुरी येथे गेल्या होत्या. त्या गावाला गेल्यानंतर दोन-चार दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येण्यास सुरवात झाली.

मात्र, मांजर अथवा घूस मेले असावे व ते कुजल्याने दुर्गंधी येत असावी असा शेजाऱ्यांनी समज केला. मात्र, दुर्गंधी कायम होती. घरमालक नसल्याने दरवाजा उघडता आला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Dhule Crime News : चिमठाण्यात महिलेला ठार करण्याची धमकी देत जबरी चोरी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चंपावती तारगे घरी परतल्या. दुर्गंधी अधिक येत असल्याने त्यांनी साफसफाईसाठी मजुरांना बोलावले.

घरात सफाई करताना एका मजुराला मानवी मृतदेहाच्या पायाचा एक भाग खाली पडलेला दिसला, तर दुसरा पाय वरच्या मजल्यावर लटकल्याचे निदर्शनास आल्याने तो घाबरून बाहेर आला. याबाबत माहिती कळताच आझादनगर पोलिस ठाण्याचे अभय मोरे, चंद्रकांत पाटील, अविनाश लोखंडे, संतोष घुगे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास सुरू आहे.

Crime News
Dhule Bribe Crime : 7 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.