धुळे : शहर, परिसर आणि तालुक्यातील खडीक्रशर व्यावसायिकांकडे सुमारे २० ते २५ कोटींचा महसूल थकीत आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Roughly 20 to 25 crores of revenue owed to gravel crusher businessman Action taken dhule news)
या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनुसार तहसीलदार तथा खनिकर्म अधिकारी प्रथमेश घोलप यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ३) बल्हाणे (ता. धुळे) येथे एका खडीक्रशरवर कारवाई केली. अपूर्तता आढळल्याने ही कारवाई झाली.
पथकाने कारवाईतील खडीक्रशरचा वीजपुरवठाही खंडित केला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैधरीत्या खडीक्रशर चालविणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले आहे. बल्हाणे शिवारातील शिवकृपा खडीक्रशर आहे. अपर जिल्हाधिकारी केकाण यांच्या सूचनेनुसार श्री. घोलप, मंडळाधिकारी किरण कांबळे, तलाठी गीता चव्हाण (बल्हाणे), तलाठी महेंद्र पाटील (कुसुंबा) यांनी क्रशरची पाहणी केली.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
शहानिशा केल्यानंतर गौणखनिज विभागाच्या पथकाने जागेवरच शिवकृपा खडीक्रशरवर कारवाईचा बडगा उगारला. शासकीय नियमानुसार अपूर्तता आढळल्यामुळे खडीक्रशर सील केले. तत्कालीन तहसीलदार किशोर कदम यांच्या सेवाकाळात याच शिवकृपा खडीक्रशरला दोन ते अडीच कोटींचा दंड आकारण्यात आला होता.
त्यानंतर क्रशर सील केले होते. तेव्हापासून हे क्रशर बंद होते. मात्र, पुन्हा सुरू झाल्यावर शुक्रवारी झालेली दुसरी कारवाई आहे. धुळे तालुक्यात ठिकठिकाणी अवैध उत्खनन होत असल्याचे चित्र आहे. वर्षभरापासून अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. पथकाच्या अहवालानुसार खडीक्रशर चालकाविरोधात कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
"बल्हाणे शिवारातील शिवकृपा खडीक्रशरचालकाकडे अपूर्तता आढळल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ‘सील’ची कारवाई केली. पथकाच्या अहवालानंतर पुढील कार्यवाई केली जाईल." -प्रथमेश घोलप, तहसीलदार तथा खनिकर्म अधिकारी, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.