Dhule Crime News : निर्दयी मामाने भाच्याचा घेतला जीव; धुळ्यातील संतापजनक घटना

crime
crimeesakal
Updated on

Dhule Crime News : ‘भाचा रडत असल्याने माझे डोके दुखते’ असे म्हणत सख्ख्या मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केल्याची संतापजनक व धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ५) धुळे शहरातील फिरदोसनगर येथे भरदिवसा घडली.

या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.(ruthless uncle took life of his nephew dhule crime news)

मरियम बी. एजाज हुसेन (रा. फिरदोसनगर, रातराणी चौक, मसूद मशिदीजवळ, धुळे) या महिलेच्या फिर्यादीनुसार त्या परिवारासह फिरदोसनगरात राहतात. त्यांचे पती लॅब टेक्नेशियन आहेत. त्यांना मोहम्मद हम्माद (वय साडेपाच वर्षे) व मोहम्मद हाजिक (४) अशी दोन मुले आहेत.

तिचे आई-वडील व भाऊ नुरुल अमीन नईम अहमद घरापासून जवळच राहतात. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तिला व तिच्या मुलांना पतीने तिच्या आई-वडिलांकडे सोडले व कामासाठी बाहेर गेले. मरियम घरात आईसोबत बोलत असताना मोहम्मद हाजिक व त्याचा मामा नुरुल अहमद दोघे खेळत होते.

थोड्या वेळात मुलाचा आवाज येत नसल्याने मरियमने त्याचा शोध सुरू केला. तिला मुलगा मोहम्मद घरातील बाथरूमच्या प्लॅस्टिकच्या टाकीत वर पाय, खाली डोके अशा अवस्थेत दिसला. त्याला बाहेर काढून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

crime
Dhule Crime News : वाडीजवळ अवैध मद्याचा ट्रक जप्त; संशयित फरारी

मुलगा मोहम्मदच्या अशा अवस्थेबाबत मरियमने तिचा भाऊ नुरुल याला विचारणा केली असता त्याने ‘मोहम्मद रडत होता, त्याच्या रडण्याने माझे डोके दुखत असल्याने मी त्याला ड्रममध्ये टाकून दिले’ असे सांगितले.

मरियम यांचा जेठ रफिक अहमद याने मोहम्मदला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यावरून नुरुल अमीन नईम अहमद याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

crime
Dhule Crime News : पावणेचारशे टवाळखोरांवर कारवाई; पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.