MPSC Success Story : शहरातील कष्टकऱ्यांच्या मिल परिसरातील वासुदेव जोशी-गोंधळी भटक्या समाजातील सचिन चांगदेव बोरसे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत एकाच वेळी दोन पदांवर यश मिळविले. (Sachin Borse cleared two posts simultaneously in MPSC dhule news)
त्याच्या या दुहेरी यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यानिमित्त गुरुवारी (ता. १३) चितोड रोडवरील ध्वज चौकात सचिनचा मिल परिसरातर्फे सत्कार झाला.
लीलाबाईची चाळ येथे सचिनचे वास्तव्य आहे. मराठी भाषेतून त्याने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या सचिनचे लहानपणीच मातृछत्र हरपले. परिस्थितीची जाण ठेवत त्याने बाहेर काम करीत शिक्षण पूर्ण केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एमपीएससीचा अभ्यास करतानाही तो शहरातील एका खासगी रुग्णालयात रात्री कामाला जायचा. त्याच्या कष्टाचे चीज झाले.
त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा दिल्या. दोन्ही परीक्षांमध्ये त्याने आपल्या यशाचा झेंडा रोवला. एमपीएससीतून घेतल्या गेलेल्या टॅक्स असिस्टंट आणि क्लार्क या दोन पदांवर त्याची निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.