शहादा (जि. नंदुरबार) : शहादा शहराबाहेरून जाणाऱ्या कोळदा-खेतिया काँक्रिट रस्त्यावरील शून्य उपाययोजनांमुळे अपघातात वाढ होत आहे. ‘सुसाट वाहनांमुळे निष्पाप नागरिकांच्या बळी’ या मथळ्याखाली (सकाळ ः ता. ३) वृत्त प्रकाशित झाले.
रस्त्याबाबत सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, संबंधित विभागाने जबाबदारी निश्चित करून तत्काळ अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (SAKAL Impact Kolda Khetia road Take measures to prevent accident nandurbar News)
कोळदा-खेतिया हा सिमेंट काँक्रिटच्या मार्ग वाहनधारकांसाठी आनंददायी असला तरी तो आजपर्यंत अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे.
अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे, अन्यथा शहर व परिसरातील विविध संघटना व नागरिकांतर्फे दबावगट निर्माण करून प्रशासनाकडून काम करून घ्यावे लागेल, तर काही स्वयंसेवी संघटनांनी प्रशासन तयार नसेल तर स्वतः उपाययोजना करण्यासाठी सरसावल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. उपाययोजना केल्याने निदान बळींची संख्या तरी कमी होईल.
‘सकाळ’चे मानले आभार
दरम्यान, रस्त्यावर होणाऱ्या अपघातांविषयी प्रशासनास जाग येण्यासाठी ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त मांडल्यानंतर सोशल मीडियावरून लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिकांनी ‘सकाळ’चे अभिनंदन करून आभार मानले.
"हा रस्ता नॅशनल हायवेमध्ये येतो. संबंधित कमिटीची बैठक घेऊन तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून रस्त्याची व निगडित जी कामे अपूर्ण आहेत ती तत्काळ पूर्ण करण्यास सांगून ज्या ज्या ठिकाणी वारंवार अपघात झाले आहेत, तसेच अजून काही ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी तत्काळ गतिरोधक तसेच इतर उपाययोजना करण्यासंबंधी सूचना करणार आहे."-राजेश पाडवी, आमदार, शहादा-तळोदा मतदारसंघ
"रस्त्यावर वारंवार अपघात होऊन बळींची संख्या वाढतच आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्यावर गतिरोधक बसविणे अगत्याचे आहे. तसेच जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ बैठक लावावी, अन्यथा स्वयंसेवी संस्था स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर गतिरोधक टाकतील." -अभिजित पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद, नंदुरबार
"शहादा शहरापासून काही अंतरावर आमचे गाव आहे. डोंगरगाव चौफुलीवरून दररोज ये-जा करावी लागते. याच डोंगरगाव चौफुलीवर दिशादर्शक फलक नाहीत, गतिरोधक नाहीत, अति वेगाने चालक वाहने चालवितात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या सर्व गोष्टीला जबाबदार यंत्रणेने लवकरात लवकर उपाययोजना करावी."
-मच्छिंद्र पाटील, डोंगरगाव
"रस्त्यावर दिशादर्शक फलक, चौफुलीवर विद्युतीकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गतिरोधक, न केलेले ॲपरोच रस्ते, चौफुलीवर रस्त्यावर चुकीची वळणे ही मुख्य अपघाताची कारणे आहेत. यास ठेकेदारासह यंत्रणा कारणीभूत आहेत. मुदतीतच रस्त्याचे बारा वाजले आहेत. तक्रारीची दखल घेतली जात नाही, म्हणून होणाऱ्या अपघातास यंत्रणाच जबाबदार आहे. लक्ष न घातल्यास जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करावे लागतील."
-अनिल भामरे, सामाजिक कार्यकर्ता
"रस्ते अपघातात निष्पाप जीव जाणे अतिशय क्लेशदायक आहे. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिस प्रशासनाने जबाबदारीने कर्तव्यपालन करणे आवश्यक आहे. सामान्य जनता आंदोलन करते, मात्र प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जाते. अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्याऐवजी दुर्घटना घडू नये यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जनतेच्या हितासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्तव्यपालनासाठी कठोर आदेश दिल्यास दुर्दैवी घटना टाळता येणार आहेत."- प्रा. मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.