SAKAL Impact : कासारे ते छाईल रस्त्याची लेवल मोजणी; चाळण झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची होणार दुरुस्ती

SAKAL Impact : साक्री तालुक्यात ग्रामीण भागाला एकमेकांसाठी जोडणाऱ्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
Employees of Public Works Department taking level measurements before repair of Chhail Road.
Employees of Public Works Department taking level measurements before repair of Chhail Road.esakal
Updated on

SAKAL Impact : साक्री तालुक्यात ग्रामीण भागाला एकमेकांसाठी जोडणाऱ्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या संदर्भात ‘सकाळ’ मध्ये तेरा जूनला ‘ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कासारे फाटा ते छाईल (पाटचारीपर्यंत)रस्ता दुरुस्तीपूर्वी लेवल मोजणीस आरंभ केला आहे. लवकरच रस्त्याची दुरुस्ती झाली तर वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. ( Road level measurement of Kasare to Chaul road )

साक्री तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात दुसरा मोठा तालुका आहे. सुमारे अडीचशेपेक्षा अधिक गावे आणि पाडे आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता नादुरुस्त आहे. ग्रामीण भागातील बहुतेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सध्या साक्री तालुक्यात वरुण राजा दमदार हजेरी लावत आहे. मुसळधार पावसाने रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होण्याची शक्यता अधिक आहे.

कासारे ते छाईल सहा किलोमीटर अंतरावर चार चाकीच काय दुचाकी चालवणेही अवघड झाले आहे. दररोज खड्डे टाळण्यासाठी वाहनधारक गाडीविरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मनावर घेत रस्ता दुरुस्तीपूर्वी लेवल मोजणीस आरंभ केला असून लवकरच हा रस्ता होईल, या अपेक्षेने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळा सुरू झाल्याने इतर ठिकाणचे रस्तेही अजून खराब होणार आहेत. छाईल ते पिंपळनेर, छाईल ते प्रतापपूर, म्हसदी ते साक्री, म्हसदी ते काळगाव-राहुड, साक्री ते उंभड-वर्धाने, म्हसदी ते काकाणी भडगाव, साक्री ते विटाईसह अन्य रस्त्याची अवस्था वाईट आहे.

Employees of Public Works Department taking level measurements before repair of Chhail Road.
SAKAL Impact : चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठक

स्थानिक लोकप्रतिनिधींचा रेटा

साक्री तालुक्यातील सर्वच रस्त्यांची डागडुजी करत वाहन धारकांना दिलासा द्यावा. ज्या ठिकाणी नवीन रस्ते दुरुस्तीसाठी मंजूर असतील, ते होतील तेव्हा होतील पण सध्याची परिस्थिती पाहता डागडुजी करत दिलासा द्यावा अशा मागणीचा रेटा स्थानिक लोकप्रतिनिधींचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा वसमारचे माजी सरपंच गिरीश विश्वासराव नेरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रा. युवराज काकूस्ते, कासारे येथील माजी सरपंच रवींद्र देसले, माजी उपसरपंच बल्लदार पठाण, माजी उपसरपंच सचिन देसले, अरुण नरहर देसले यांच्यासह वाहनधारक, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींनी रस्ता दुरुस्ती विषयी मागणी लावून धरली होती. रस्ता दुरुस्ती झाल्यावर अपघाताचे प्रमाण कमी होत वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.

''साक्री तालुक्यातील बहुतेक ठिकाणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक निवडणुकीच्या काळात विकास कामांची वारेमाप आश्वासने दिली जातात. निवडणूक झाल्यावर आश्वासने हवेत विरतात. विद्यमान आमदारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नवीन दुरुस्त होणाऱ्या रस्त्याचा कामाचा दर्जा राखला जावा.''- गिरीश नेरकर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

Employees of Public Works Department taking level measurements before repair of Chhail Road.
SAKAL Impact : ...अन्‌ चौकीची झाली स्वच्छता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.