Dhule Crime News : साक्री दरोडा प्रकरण; वादग्रस्त तरुणी आता संशयितांच्या यादीत

crime
crimeesakal
Updated on

Dhule Crime News : येथील सरस्वतीनगरातील दरोडा व तरुणीच्या अपहरण प्रकरणात पोलिसांतर्फे गुरुवारी (ता. ३०) घटनास्थळी नव्याने पंचनामा करण्यात आला. तसेच फिर्यादीतदेखील आता काहीसा बदल होऊन या संपूर्ण बेबनावाच्या कटकारस्थानात तरुणीचा सहभाग दिसून येत असल्याने संशयितांमध्ये आता तरुणीचा समावेश होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.(Sakri robbery case controversial young woman now in list of suspects dhule crime news)

दहिवेल रस्त्यालगत सरस्वतीनगर येथे शनिवारी (ता. २५) दरोडा व त्यातून तरुणीच्या अपहरणाच्या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत दरोडेखोरांनी तरुणीचे अपहरण केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असताना बुधवारपासून मात्र सोशल मीडियात व्हायरल झालेल्या प्रेस नोटमधून या सर्व प्रकरणात २३ वर्षीय तरुणीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणास मोठी कलाटणी मिळाली आहे.

या प्रकरणी तरुणीशी मैत्रीपूर्ण संबंध असलेला विनोद नाशिककर व वाहनचालक रोहित गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणातील तरुणी सध्या वैद्यकीय उपचार घेत असून, ती पूर्णपणे फिट झाल्यानंतर तिला ताब्यात घेत तिची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सरस्वतीनगर येथील दरोडा व तरुणी अपहरण प्रकरण सुरवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात होते. येथील घटनाक्रम लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच दिशेने तपासाला सुरवात केली व या प्रकरणाचा उलगडा करण्यास त्यांना यश आले. या संपूर्ण घटनेत तरुणी आणि संशयित विनोद नाशिककर याचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

crime
Dhule Crime News : वृद्धेची 5 लाखांत फसवणूक; 5 जणांवर पिंपळनेरला गुन्हा

आधी सहानभुती, आता मात्र...

शनिवारी (ता. २५) ही घटना घडल्यावर त्या तरुणीविषयी सर्वांनाच काळजी वाटू लागली. तिच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त करण्यात येत होती. तिच्या शोधासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी वाहनाने शोध सुरू केला होता.

सोशल मीडियातून त्या तरुणीचे फोटो व्हायरल करत तिला शोधण्याचे आवाहन करण्यात येत होते. आता मात्र या संपूर्ण प्रकरणात त्या तरुणीचाच सहभाग समोर येऊ लागल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ती सहानुभूती गमावून बसते की काय, हा प्रश्‍न चर्चेत आहे.

crime
Dhule Crime News : 9 दुचाकी हस्तगत; एलसीबीची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()