Dhule News: दोंडाईचात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त संचारला उत्साह! लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची गर्दी

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त शहरात सकल हिंदू जनसमुदायाकडून जयश्रीरामाचा घोष करण्यात आला.
On the occasion of Shriram Mandir Pran Pratistha Utsav, former minister Dr. Hemantrao Deshmukh, Dr. Ravindra Deshmukh, Shanabhau Sonwane, Bapu Mahajan, Mahendra Patil, Bhupendra Dhangar, Shailesh Sonar etc.
On the occasion of Shriram Mandir Pran Pratistha Utsav, former minister Dr. Hemantrao Deshmukh, Dr. Ravindra Deshmukh, Shanabhau Sonwane, Bapu Mahajan, Mahendra Patil, Bhupendra Dhangar, Shailesh Sonar etc.esakal
Updated on

दोंडाईचा : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त शहरात सकल हिंदू जनसमुदायाकडून जयश्रीरामाचा घोष करण्यात आला. स्टेशन भागातील श्रीराम मंदिरात हजारो रामभक्तांनी दर्शन घेतले. दरम्यान, डीजे, ढोल-ताशांच्या गजरात राममंदिराच्या दर्शनासाठी रॅली काढण्यात आल्याने उत्साह संचारला होता.

श्रीराम मंदिरात रामनामाचा जप, रामरक्षा स्तोत्रपठण, प्रार्थना, हनुमान चालीसा, आरती आदी धार्मिक विधींनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अयोध्येतील लाइव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते. (Sanchar excited on occasion of Shri Ram Mandir Pran Pratishtha Utsav in Dondaicha People representatives crowd of workers Dhule News)

आमदार जयकुमार रावल, नयनकुवर रावल, नारायण पाटील, विजय मराठे, जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन.
आमदार जयकुमार रावल, नयनकुवर रावल, नारायण पाटील, विजय मराठे, जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन.esakal

सोमवारी (ता. २२) शहरात सकाळपासून भगवे ध्वज, रांगोळी, घरोघरी गुढी उभारण्यात आल्या होत्या. भगवे मफलर, टोपी, कुर्ता घालून रामभक्तांनी आनंदोत्सवाला सुरवात केली.

सकाळी नऊला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून श्रीराम मंदिरात जाण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, बापू महाजन, माजी सभापती रामभाऊ माणिक, अनिता देशमुख, महेंद्र पाटील, भूपेंद्र धनगर, नंदू सोनवणे, दिलीप पाटील, शैलेश सोनार, राजू देशमुख, अॅड. रवींद्र मोरे, हरीश आव्हाड (जेडी), दिनेश चोडके, प्रमोद मराठे, विजय पाटील,

रवींद्र पाटील, प्रतीक देशमुख, अशोक सोनवणे, आबा चित्ते, मनोहर देवरे, गणेश चकणे, कालू नगराळे, जितेंद्र तिरमले आदी उपस्थित होते. श्रीराम मंदिरात माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, रामरक्षा स्तोत्र म्हणत आरती केली. डॉ. रवींद्र देशमुख यांनी अनिता देशमुख सपत्नीक आरती केली.

On the occasion of Shriram Mandir Pran Pratistha Utsav, former minister Dr. Hemantrao Deshmukh, Dr. Ravindra Deshmukh, Shanabhau Sonwane, Bapu Mahajan, Mahendra Patil, Bhupendra Dhangar, Shailesh Sonar etc.
Dhule News : धुळे, नंदुरबारकरांनी नाशिक ओलांडले! मराठा समाजबांधवांची आरक्षणप्रश्‍नी जरांगेंना पाठिंब्यासाठी पदयात्रा

आमदार जयकुमार रावल यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून श्रीराम मंदिरात स्टेशन भागाकडून मिरवणूक काढली.

या वेळी उद्योजक सरकारसाहेब रावल, माजी नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सुभद्रादेवी रावल, विक्रम पाटील, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी सभापती प्रदीप कागणे, निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, हितेंद्र महाले, विजय मराठे,

रवींद्र उपाध्ये, कृष्णा नगराळे, संजय अग्रवाल, चंद्रकला सिसोदिया, रोहिणी लिंभारे, पंकज चौधरी, ललित गिरासे, मनोज निकम आदी उपस्थित होते. आमदार जयकुमार रावल, सुभद्रादेवी रावल, सरकारसाहेब रावल, नयनकुवर रावल यांनी श्रीराम मंदिरात सामुदायिक आरती केली.

On the occasion of Shriram Mandir Pran Pratistha Utsav, former minister Dr. Hemantrao Deshmukh, Dr. Ravindra Deshmukh, Shanabhau Sonwane, Bapu Mahajan, Mahendra Patil, Bhupendra Dhangar, Shailesh Sonar etc.
Ram Lalla Pran Pratishtha : शिंदखेड्यात श्रीरामाचा जयघोष! भव्य शोभायात्रा अन विविध धार्मिक कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.