Dhule Crime News : अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्रातातून अवैध वाळू उत्खनन करून अवैध वाळू वाहतूक करताना शिंदखेडा येथील तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाला बुधवारी (ता. १८) रात्री पावणेनऊच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर सापडला.
शिंदखेडा पोलिस ठाण्यात आणला असता अक्कडसे येथील सहा तरुण व इतर तीन जणांनी पोलिस ठाण्यातून ट्रॅक्टर पळवून नेल्याचा गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. (sand mafia stole sand tractor from police station dhule news crime)
अक्कडसे येथील तापी नदीपात्रातातून अवैध वाळू उत्खनन करून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती शिंदखेडा महसूल विभागाला मिळाल्यावरून शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या भरारी पथकाला एक ट्रॅक्टर वाळू भरताना सापडला.
त्या ट्रॅक्टरला भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यातून आणले असता अक्कडसे येथील हरी रमण कोळी, भाऊ शिवराम भिल, वरुळ्या (पूर्ण नाव माहीत नाही), कैलाश डोंगर कोळी, आशिष विजय कोळी, विशाल नाथा कोळी व इतर तीन अनोळखींनी पळवून लावले.
याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात विखरण व प्रभारी चिमठाणे महसूल मंडळ अधिकारी दीपक सखाराम ईशी (वय ३४) यांनी फिर्याद दिल्यावरून वरील तरुणांविरोधात शासकीय कामात अडथळा, वाळूचोरी आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दीपक पाटील तपास करीत आहेत.
घटनास्थळी अधिकारी यांची भेट
अक्कडसे येथील तरुणांनी पोलिस ठाण्यातून वाळू ट्रॅक्टर पळवून नेल्या प्रकरणी घटनास्थळी रात्रीच शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे.
पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी भेट दिली, तसेच दंगा नियंत्रण पथकाची तुकडी गावात तैनात करण्यात आली आहे.
शिंदखेडा तालुक्यात वाळूमाफियांची ‘दबंगगिरी’
शिंदखेडा तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असून, तापी नदीपाठोपाठ बुराई, पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असून, नदीकाठावरील गावांत यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या नद्या रक्तरंजित होण्यापासून कोणीच रोख शकणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.