Nandurbar News : योग्य नियोजनाअभावी शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना घरातील कचरा नेमका कुठे टाकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर उपाय म्हणून माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, माजी नगरसेविका अनिता परदेशी, संदीप परदेशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी शहरातील स्वच्छतेसाठी स्वखर्चातून स्वच्छता दूत नेमले आहेत.
तसेच, डासांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी फवारणी मशिन उपलब्ध करून दिली आहे. (Sanitation Envoy at own expense for cleanliness Work for eradication of mosquitoes along with garbage collection Nandurbar News)
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा तथा माजी नगरसेविका अनिता परदेशी, शहराध्यक्ष योगेश मराठे, संदीप परदेशी, विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, खरेदी विक्री संचालक चंदू भोई, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष आरिफ शेख नुरा, याकूब पिंजारी, साबीर अली सब्दार अली, मुश्ताक अली, शेख रफिक, सईद पठाण, संजय राणे, नासीर हारून, गणेश पाडवी, सरचिटणीस महेंद्र पोटे, खजिनदार धर्मराज पवार, संघटक राहुल पाडवी, शहर उपाध्यक्ष अनिल पवार, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, नितीन वाघ, इंद्रजित राणे, वैभव कर्णकार, कार्तिक राजकुळे, इमरान शिकलीकर, प्रकाश पाडवी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे म्हणाले, तळोद्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली असून त्यामुळे नागरिक आपल्या प्रभागात निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत आहे.
दरम्यान घन कचरा व्यवस्थापन ठेका ९ सप्टेंबर २०२२ पासून संपल्याने पालिकेकडून राबवली जाणारी कचरा संकलनाची मोहीम विस्कळित झाली आहे. पालिकेत सध्या जवळपास ३८ स्वच्छता कर्मचारी नियुक्त असून योग्य नियोजन अभावी शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
नागरिकांना घरातील ओला, सुका कचरा नेमका कुठे टाकावा असा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकजण उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, रिकाम्या प्लॉटवर, ओपन प्लेसमध्ये कचरा टाकताना दिसून येत आहेत. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे व यातून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन आणि कचरा संकलित होत नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या त्रास होऊ नये व त्यांच्या आरोग्याबाबत कोणत्याही धोका निर्माण होऊ नये यासाठी स्वखर्चातून स्वच्छता दूत नेमले आहेत.
नागरिकांनी स्वच्छतेविषयी निर्माण झालेल्या समस्यांबाबत स्वच्छता दूतांशी संपर्क साधला तर स्वच्छता दूत त्याठिकाणी जात नागरिकांच्या स्वच्छता विषयक समस्या सोडविणार आहेत.
याशिवाय फवारणी मशिनद्वारे डासांच्या निर्मूलनासाठी स्वच्छता दूत काम करणार आहेत. या स्वच्छता दूतांना माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व माजी नगरसेविका अनिता परदेशी, शहराध्यक्ष योगेश मराठे, संदीप परदेशी यांच्याकडून स्वखर्चातून मानधन दिले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.