Sarangkheda Yatra 2023: सारंगखेड्यातील यात्रेला आजपासून सुरवात; जयघोषाने दुमदुमली सारंगखेडा नगरी

On Monday, on the eve of the Yatra, in the presence of saints, mahants, thousands of devotees, performing the Mahaarti of Shri Datta.
On Monday, on the eve of the Yatra, in the presence of saints, mahants, thousands of devotees, performing the Mahaarti of Shri Datta. esakal
Updated on

Sarangkheda Yatra 2023 : भल्या पहाटेपासूनच मंदिरात घंटानाद... महानुभाव पंथीय संस्कारानुसार एकमुखी दत्ताच्या मूर्तीला आचार्य, मंदिर ट्रस्टी, भक्तगणांच्या हस्ते विधिवत स्नान, अक्षदा, विडाअसर, पूजन करत उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने मुखी भगवान श्री दत्तात्रेय प्रभू की जय.... च्या नामघोषाने सारंगखेडानगरी आज दुमदुमून गेली होती.

निमित्त होते श्रीदत्त जयंतीनिमित्त सायंकाळच्या महाआरती व पालखी सोहळ्याचे... (Sarangkheda yatra starts from today nandurbar news )

सारंगखेडा येथील एकमुखी श्री दत्ताच्या यात्रेला मंगळवार (ता. २६)पासून सुरवात होत आहे. मंदिरात आज दत्त प्रभूची महाआरती व पालखी सोहळा झाला. चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील, तसेच मंदिर ट्रस्टी आदींसह विविध विभागांचे अधिकारी, आचार्य, भक्तगण, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. विधिवत स्थान, अक्षदा, विडाअवसर, महाउपहार, पारायण करण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसराच्या भागातून पालखी सोहळा झाला.

पहाटे स्थान विधी

पहाटे तीनला घंटानांदात दत्तप्रभूंच्या मूर्तीला विधिवत स्नान आणि उटी अवसर करण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पहाटेपासूनच स्थानिक भक्तांची रांग लागली. नवसाला पावणाऱ्या दत्ताला साकडे घालण्यासाठी जिल्हाभरातून अनेक गावांतील नागरिक पायी चालत येऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले.

On Monday, on the eve of the Yatra, in the presence of saints, mahants, thousands of devotees, performing the Mahaarti of Shri Datta.
Sarangkheda Yatra : उच्च शिक्षित तरुणांची 800 किलोमीटरची अश्वरपेट; आयोजकांकडून जंगी स्वागत

सायंकाळी सातला दत्तप्रभूची मूर्ती भगवंताच्या नामघोषाच्या जयजयकार करत मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर आणली गेली. उपस्थित पाच हजार भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. लोणखेडा येथील भजनी मंडळी, तसेच इतर गावांतील नागरिकांनीही साथ दिली. प्रभू नामाच्या जयघोष करत गावातून श्री प्रभूंची पालखी मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. अंगणात सडा-रांगोळी काढण्यात आली होती.

दत्तप्रभूंची प्राचीन मूर्ती

नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती असलेल्या एकमुखी श्री दत्त प्रभूंची मूर्ती ३०० वर्षांहून अधिक जुनी असून, मूर्ती पंचधातूंनी बनलेली आहे. त्यात सोने, चांदी, जस्त, पितळ आदी धातूंचा वापर करण्यात आला आहे. मूर्ती मंदिराच्या दगडी गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. मंदिराला प्राचीन व ऐतिहासिक इतिहास आहे.

On Monday, on the eve of the Yatra, in the presence of saints, mahants, thousands of devotees, performing the Mahaarti of Shri Datta.
Sarangkheda Yatra : सौदर्य स्पर्धेत राजस्थानचा ‘सरदारजी’ प्रथम; अश्वांच्या विविध स्पर्धांना देशभरातून प्रतिसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.