Dhule News : पावणेतेरा लाख पशुधनाचे पोट कसे भरायचे? जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांपुढे प्रश्‍न

Dhule News : पावणेतेरा लाख पशुधनाचे पोट कसे भरायचे? जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांपुढे प्रश्‍न
esakal
Updated on

Dhule News : पावसाअभावी जिल्ह्यात पीकपाण्याची चिंता तर आहेच; पण आपल्याकडील पशुधनाची भूक कशी भागवावी, याचेही मोठे संकट शेतकरी, पशुपालकांपुढे उभे राहणार आहे. कारण पावसाअभावी चाऱ्याची टंचाईदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

शहरासह जिल्ह्यात यंदा वरुणराजा जेमतेमच बरसला आहे. काही भागात काही दिवस दमदार पाऊस झाल्याने काही प्रकल्प भरले इतर तलाव, प्रकल्प मात्र कोरडेठाक होण्याच्या मार्गावर आहेत. (satisfy hunger of livestock will big problem for farmers and herders dhule news)

शिवाय पिकेही आता कोमेजू लागली आहेत, अनेक ठिकाणी पिके जळत आहेत. ज्या पिकांनी अद्यापही थोडाफार तग धरला आहे, त्यांना शेतकरी कसाबसा जगविण्याचा प्रयत्न करत आहे.

पाऊस पडेल व या पिकांना जिवदान मिळेल या आशेवर शेतकरी आहे. त्यामुळे पिकपाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न उभा आहे. याबरोबरच शेतकरी, पशुपालकांना आपल्याकडील पशुधनाचे पोट कसे भरावे याचीही चिंता आहे.

पावसाने ओढ दिल्याने गुरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता काही शेतकरी आत्तापासूनच मिळेल त्या ठिकाणाहून चारा आणून साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule News : पावणेतेरा लाख पशुधनाचे पोट कसे भरायचे? जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांपुढे प्रश्‍न
Dhule News : अस्मानीसह सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त; शेतशिवारात भारनियमन वाढले

रब्बीतही नुकसान

जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होतो. मात्र, गेल्यावर्षी रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे शेती, शिवारे हिरवीगार झाली. त्यामुळे गुरांना गवत व इतर चारा उपलब्ध झाला. मात्र, संपूर्ण ऑगस्ट कोरडा गेल्याने तसेच तापमानही सातत्याने वाढत असल्याने गवतही वाळू लागले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता पाऊसाने अशीच पाठ फिरविली तर जिल्ह्यात चाऱ्याचाही मोठा प्रश्‍न उभा ठाकण्याची भिती आहे.

चारा संपण्याच्या मार्गावर

कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात तीन लाख ६३ हजार ६६० लहान गुरे, ९७ हजार ६५९ मोठी गुरे आहेत. तसेच शेळ्या-मेंढ्यांची संख्या आठ लाख २४ हजार ६७३ एवढी आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण पशुधन १२ लाख ८५ हजार ९९२ एवढे आहे. या पशुधनाला प्रतिदिन पाच हजार १८७.६ टन चारा लागतो. जुलैअखेरपर्यंत ८२ हजार १३८ टन चारा उपलब्ध होता. मात्र, आता हा चारा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे.

Dhule News : पावणेतेरा लाख पशुधनाचे पोट कसे भरायचे? जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांपुढे प्रश्‍न
Dhule News: महापालिका कर्मचाऱ्यांची आता प्रवेशद्वारात हजेरी; आढळले 72 लेटलतिफ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.