धुळे : बहिणीविषयी उलटसुलट बोलणे, तिची बदनामी केल्याच्या रागातून मोहाडी उपनगरातील रिक्षाचालक मित्र सतीश मिस्तरी (वय २२) याचा शिरच्छेद करत खून केल्याची कबुली चेतन
गुजराथी याने शुक्रवारी (ता. २४) चौकशीवेळी दिली. (Satish Mistry brutally murdered by chetan gujarati for defaming his sister dhule crime news)
चेतन आणि सतीश एकमेकांच्या घराजवळ राहतात. सतीशचा विवाह ठरला होता. त्याआधीच त्याचा गळ्यापासून शिरच्छेद करत क्रूर पद्धतीने संशयितांनी बदला घेतला. संशयित चेतन याच्यासोबत अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतनला अटक झाली आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मोहाडी पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने केवळ बारा तासांच्या आत खुनाचा उलगडा केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. श्री. बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी तपासाबाबत माहिती दिली.
मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवधान शिवारातील पडीक शेतात गुरुवारी (ता. २३) शिर नसलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला. खुनाच्या क्रूर घटनेनंतर खळबळ उडाली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
पोलिस अधीक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, पोलिस उपअधीक्षक संभाजी पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी आदी घटनास्थळी दाखल झाले.
तपासात खून झालेल्या तरुणाचे नाव सतीश बाबू मिस्तरी (वय २२, रा. शिवानंद कॉलनी, मोहाडी) असे निष्पन्न झाले. नंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशासह मार्गदर्शनाने मोहाडी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. घटनास्थळावरचे पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे एलसीबीने संशयित कोण असावेत हे हेरले.
यात मोहाडीतील दंडेवाला बाबानगरामधील चेतन प्रताप गुजराथी (वय २१) याचे मारेकरी म्हणून नाव पुढे आले. त्याचे लोकेशन घेत एलसीबीचे पथक औरंगाबादला पोचले. तेथे चेतनला ताब्यात घेतले. मोहाडी पोलिसांनी या गुन्ह्यातील दुसऱ्या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.