निमगूळ (जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील नेवाडेची सायली पाटील (Sayli Patil) ही नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या मराठी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे.
सायलीच्या निवडीमुळे नेवाडे गावाच्या व आजोळ निमगूळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Sayli Patil from of Nevada is playing female lead in Marathi film Ghar Banduk Biryani directed by Nagraj Manjule dhule news)
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील रहिवासी नरेंद्र विक्रम पाटील हे पुणे जिल्हा दूध संघात कात्रज डेअरीला व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते, त्यामुळे पुण्याला स्थायिक झाले. अभिनेत्री सायली पाटीलचे शिक्षण पुण्यातील नुमवि आणि भानुबाई नानावटी आर्किटेक्ट कॉलेजला झाले असून, ती आर्किटेक्ट आहे. तिचे स्वतःचे आर्किटेक्ट फर्म असून, सायली पाटील मुंबईला आर्किटेक्टच्या इंटर्नशिपसाठी गेली असताना नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटासाठी घेण्यात येणाऱ्या ऑडिशनमध्ये तिची निवडही झाली होती; परंतु काही कारणास्तव संधी हुकली होती.
त्यानंतर तिने चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड ‘झुंड’ चित्रपटात तिला भूमिका मिळाली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिला हिंदी चित्रपट केला. त्यात तिला अभिनयाची जोड मिळाल्याने तिला पुन्हा संधी मिळाली आणि आता झी स्टुडिओ आटपाट प्रॉडक्शन निर्मित ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या मराठी चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिका साकारली असून, धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
ही बाब निमगूळ (ता. शिंदखेडा) येथील मामा डॉ. जितेंद्र जिजाबराव देसले व चंद्रशेखर जिजाबराव देसले यांनी सांगितली. निमगूळ हे आजोळ असल्याने कौटुंबिक समारंभात बहीण सुनीता पाटीलसह भाची सायली पाटील, मेहुणे नरेंद्र विक्रम पाटील यांचे कायम येणे-जाणे आहे. धुळे जिल्हा माजी कृषी सभापती प्रा. अरविंद विक्रम जाधव यांची ती पुतणी आहे.
येत्या ७ एप्रिल २३ ला सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या चित्रपटात तिने अभिनेता आकाश ठोसरसोबत मुख्य भूमिका साकारली असून, जिल्ह्यात कौतुक होत आहे. सध्या या चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर (परश्या) आणि अभिनेत्री सायली पाटील यांचे गुन गुन गाणे सर्वत्र गाजत असून, महाराष्ट्रभर तरुणाई या गाण्यावर थिरकत आहे. खानदेशकन्या अभिनेत्री स्मिता पाटीलनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सायली पाटील हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.