Dhule School Reopen : पुस्तकाच्या 4 भागांमुळे विद्यार्थ्यांचे दप्तर होईल वेटलेस; शिक्षकांकडून शाळेची स्वच्छता

 School Reopen
School Reopenesakal
Updated on

Dhule School Reopen : धुळे जिल्ह्यात पहिली ते आठवीची मोफत पाठ्यपुस्तके सर्व शाळांपर्यंत पोचली आहेत. शिक्षण विभागाचे सुयोग्य नियोजन, अधिकाऱ्यांची तत्परता आणि शिक्षकांच्या धावपळीतून पुस्तके शाळांना पोच झाली.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबरच मोफत पाठ्यपुस्तकेही हाती पडणार आहेत (school reopen students on first day of school free textbooks will also be handed out dhule news)

या वर्षी चार भागांत दाखल झालेली पुस्तके विशेष आकर्षण ठरणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. दप्तर वेटलेस होण्यास मदत होईल.

गेल्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी चार भागांत पुस्तके तयार झाली. तो प्रयोग यशस्वी झाल्याने आता दुसरी, तिसरी आणि चौथीची पुस्तकेही चार भागांत तयार झाली आहेत. प्रत्येक भागात सर्व विषयांचा समावेश केलेला आहे.

किमान दोन महिने एक भाग वापरता येणार आहे. तेवढा पाठ्यक्रम समाविष्ट आहे. पुस्तकांची सुरेख छपाई, आकर्षक चित्रे आणि मजबूत बांधणी प्रथमदर्शनी दिसून येते.

दुसरीचा पहिला भाग व्हावा लवकर दाखल

दुसरीसाठीच्या चार भागांपैकी तीन भाग दाखल झाले आहेत. पहिल्याचे भागाचे पुस्तक दाखल झालेले नाही. ते लवकर दाखल होणे आवश्यक होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 School Reopen
School: दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांची सुटका! यंदा तीन भागांत पुस्तकांचे होणार वाटप

शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू होणाऱ्या अध्यापनावर परिणाम होणार आहे. किमान शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे

शिक्षकांसाठी उद्‌बोधन सत्र

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३-२४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. ही पुस्तके या वर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व ऊर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत.

या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत. पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे करावा या संदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्‌बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt या लिंकवर १४ जूनला सकाळी अकरापासून उपलब्ध करून दिले आहे.

 School Reopen
Jay Shri Ram in School : शाळेत 'जय श्रीराम' घोषणा; दहावीच्या ६ विद्यार्थ्यांच्या निलंबनवरून पालक संघटना आक्रमक

"चार विभागांत विभागलेले पुस्तक आदर्शवत आहे. मुलांना हाताळण्यासही सोयीस्कर आहे. पुस्तकात समाविष्ट केलेली कोऱ्या पानांचा विविध नोंदीसाठी उपयोग होणार आहे." -रामराव पाटील, केंद्र मुख्याध्यापक, जि.प. शाळा क्रमांक एक, कापडणे

"पुस्तके चार भागांत केल्याने, विद्यार्थ्यांना एकच पुस्तक सोबत आणावे लागेल. त्याच्यात कोरी पाने असल्याने नोंदीसह स्वाध्यायासाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होण्यास मोठी मदत झाली आहे." -सतीश शिंदे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, धनूर (ता. धुळे)

शाळांची सजावट करणार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मंगळवारी (ता. १३) सर्वच शिक्षक उपस्थित झाले. दीर्घ उन्हाळी सुटी अनुभवली. आळस झटकत शाळांची साफसफाई केली. शाळेचा परिसर चकाचक केला. दुसऱ्या दिवशी शाळा आणि वर्ग सजावट केली जाणार आहे. १५ जूनपासून शाळा गजबजतील.

 School Reopen
Jalgaon School Reopen : जिल्ह्यातील शाळांची घंटा उद्या वाजणार.... शाळा प्रवेशोत्सव होणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.