Dhule News : वाहकाच्या मनमानीमुळे विद्यार्थिनी परीक्षेला गैरहजर; चिमुकल्या रडतच घरी
Dhule News : वाहकाच्या मनमानीमुळे परीक्षेला न जाता चिमुकल्या रडत घरी परतल्या. पास असूनही शाळेच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनींना वाहकाने बसू दिले नाही, परीक्षेला गैरहजर राहावे लागल्याने छावडी (ता. साक्री) येथील पाचवी व सातवीच्या मुली रडतच घरी पोचल्याने पालकांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. (Schoolgirls were denied entry to bus by bus driver dhule news)
छावडी येथील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी लामकानी येथील इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी ये-जा करतात. मंगळवारी (ता. १२) सकाळी नेहमीप्रमाणे पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी छावडी येथील बसथांब्यावर उभ्या असताना लामकानीमार्गे शनिमांडळ ते धुळे बसने इतर प्रवाशांना बसविले; परंतु शाळेतील विद्यार्थिनींना बसविले नाही.
हा प्रकार नेहमीचाच असल्याने पालक संतप्त झाले. मंगळवारी शाळेत चाचणी परीक्षा सुरू असल्याने सर्व मुलींनी वाहकास विनंती केली. शाळेत गेलो नाही तर परीक्षेला गैरहजर राहावे लागेल, असे सांगितले; परंतु मुजोर वाहकाने इतर प्रवाशांना बसू दिले आणि सर्व शाळेकरी मुलींना न बसविता बसचा दरवाजा बंद करून बस मार्गस्थ केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बसमध्ये प्रवेश दिला नसल्याने शाळेत जाता आले नाही व परीक्षेस गैरहजर राहावे लागल्याने पाचवी सहावी व सातवीच्या चिमुकल्या रडतच घरी पोचल्या. वारंवार मुलींना प्रवेश न देता बस मार्गस्थ केली जात असल्याने शिवाय परीक्षेला गैरहजर राहावे लागल्याने पालकांनी संबंधित वाहक आणि चालकावर कारवाईची मागणी केली.
"पाचवीत असणारी माझी कन्या सकाळी तयारी करून शाळेत गेली होती; परंतु थोड्या वेळात ती रडत घरी परतली. तिला कारण विचारले असता वाहकाने बसमध्ये बसू दिले नाही. त्यामुळे शाळेतील परीक्षेला अनुपस्थिती लागली, असे सांगितले. ही बाब संतापजनक असून आमच्या मुलींचे शैक्षणिक नुकसान झाल्याने शनिमांडळ बसच्या चालक व वाहकावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे." -हिंमत वाघ, छावडी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.