Dhule Tuberculosis News : धुळ्यात 10 हजार घरांत क्षयरुग्णांचा शोध; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Tuberculosis
Tuberculosissakal
Updated on

Dhule Tuberculosis News : शहरातील क्षयरुग्ण शोधण्यासाठी धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मोहीम राबविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने अतिजोखीम भागात सक्रिय क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. शहरातील अतिजोखीम भागातील सुमारे दहा हजार घरांना भेटी देत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

राज्य क्षयरोग विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे क्षयरुग्ण शोधमोहिमेच्या अनुषंगाने यापूर्वी महापालिकेच्या सभागृहात सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक यांची बैठक घेण्यात आली. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शक सूचनेनुसार माहिती दिली. (Search for tuberculosis patients in 10 thousand houses in Dhule news)

क्षयरुग्ण शोधमोहिमेत अतिजोखीम भाग यात झोपडपट्टी, वीटभट्टी, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, कारागृह, बेघर निराधार मुले, खाण कामगार,‍ आदिवासी मुलांचे वसतिगृह,‍ एचआयव्ही अतिजोखीम गट, गिरणी कामगार अशा ठिकाणी नऊ हजार ८७९ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात ४९ हजार ४२६ एवढ्या लोकसंख्येची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.

पथके नियुक्त

यासाठी एकूण २४ तपासणी पथके व पाच पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी नागरी आरोग्य केंद्रस्तरावर काम करणाऱ्या आशा सेविका, क्षेत्रीय कर्मचारी, स्वयंसेवक, पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हे पथक घरोघरी भेटी देऊन क्षयरोग आजाराविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करतील. तपासणीत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्स-रे, थुंकी तपासणी जवळच्या मनपाच्या दवाखान्यात करून रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरित मोफत औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत.

Tuberculosis
Dhule News: नव्याकोऱ्या ‘अक्कलपाडा’ योजनेतूनही तहान भागेना; पाइपलाइन दुसऱ्यांदा फुटली

मोहिमेत जनतेने सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, सभागृह नेत्या भारती माळी, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

अशी होईल नोंद

या शोधमोहिमेत घरोघरी जाऊन घरातील सदस्यांची तपासणी करण्यात येईल. घरातील सर्व सदस्यांची तपासणी झाल्यावर घरावर (T) लिहून घराचा क्रमांक व तारीख नोंदविण्यात येणार आहे. घरातील एक किंवा सर्व व्यक्तींची तपासणी करावयाची राहिली तर एचएक्स (HX), सदस्यांनी तपासणीस नकार दिल्यास एक्सआर (XR), सर्व्हेच्या वेळी गैरहजर सदस्य परत येणार नसेल तर एक्सव्ही (XV), घर कायमचे बंद असेल तर एक्सएल (XL) अशी खूण दर्शविण्यात येणार आहे.

क्षयरोगाची लक्षणे

क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून, तो कोणालाही होऊ शकतो. क्षयरोग मुख्यत्वे फुप्फुसांवर परिणाम करतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, दोन आठवड्यांहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, थुंकीवाटे रक्त जाणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत.

Tuberculosis
Dhule Dadar Railway : धुळे-दादर रेल्वेला 3 महिने एक्सटेन्शन; आठवड्यातून 3 दिवस धावणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.