कापडणे (जि. धुळे) : मुंबई पोलिसांचे जगात नाव आहे. त्यांच्या कामगिरीला तोड नाही. मुंबईची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास त्यांचे मोठे योगदान नाकारता येणारच नाही. येथील एका व्यावसायिकाची लाखाची वस्तू मुंबईत सकाळी आठला चोरीला गेली.
साऱ्यांनीच नाहीच सापडणार असे सांगितले. पोलिस ठाण्यातही जाऊ नकोचा सल्ला दिला. पण त्या गड्याने तत्काळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्कळ तपासाची चक्रे फिरविली अन् अवघ्या दोन तासांत लाखाची वस्तू शोधून काढली. (Search of lakh machine in two hours by mumbai police dhule news)
त्याचे डोळे पाणावले. त्याने मुंबई पोलिसांना सलामच ठोकला. सोबत असलेल्या त्याच्या चिमुरडीने तर ‘मुंबई पोलिस काका इज ग्रेट’ असे म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
येथील दत्तात्रय पाटील सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व. सामाजिक कामात अग्रेसर. छोट्या व्यवसायातून पुढे जाण्याची धडपड करीत आहेत. त्यांच्या कन्हय्या बॅण्ड पार्टीचे डीजे ॲम्प्लिफायर बिघडले. त्याची किंमत एक लाखावर आहे. ते दुरुस्तीसाठी मुंबईच गाठावी लागते.
त्यासाठी त्यांनी रात्रीचा प्रवास करून मुंबई गाठली. सोबत चौथीतील लेकही होती. दुरुस्तीला टाकले म्हणजे सायंकाळपर्यंत मिळते. रविवारची सुटी असल्याने लेक कान्हूला समुद्र, गेट वे ऑफ इंडिया आदी दाखवूनही होईल. एकंदरीत जिवाची मुंबई त्यांना करायची होती. सर्व काही ठरविले होते.
सकाळी आठला ग्रॅंट रोडला उतरले. तिथे बाजूलाच असलेल्या पानटपरीजवळ थांबले. डीजे ॲम्प्लिफायर दुरुस्तीचे दुकान तेथून वीस मिनिटांच्या अंतरावर होते. अकराला उघडते. त्यांनी शेजारील टपऱ्यावाल्यांजवळ माहिती घेण्यास सुरवात केली.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
केवळ दोन मिनिटांतच चाळीस-पन्नास फुटांवर ठेवलेले अर्धा क्विंटल वजनाचे एक लाख दहा हजार किमतीचे ॲम्प्लिफायर गायब झाले नि पाटील सुन्न झाले. साऱ्यांनीच ‘ये मुंबई है भाई. नाही सापाडणार,’ असे सुनावले. सोबत असलेल्या लेकीचे डोळे पाणावले. त्यांनी पोलिसांकडेही न जाण्याचा सल्ला दिला.
पण पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीविषयी आणि सहकार्याविषयी ऐकलेले होते. थेट सकाळी साडेआठला डॉ. दा. भ. मार्गावरील पोलिस ठाणे गाठले. तिथे सारेच कामात व्यस्त होते. सारी हकीगत सांगितली. साऱ्यांनीच शांतचित्ताने ऐकून घेतले. सकाळची छानपैकी कॉफी आणि छोट्या कान्हूसाठी बिस्किटे मागविली अन् तपासाची चक्रे फिरविली.
स्पॉटवर गेले. थोडा माग काढला. परत आले अन् सीसीटी फुटेज चेक करण्याचा श्रीगणेशा केला. मुंबईतील प्रत्येक सिग्नलवर बसविलेले फुटेजने चोरट्यांचा छडा लावला. ते थेट ज्या दुकानापर्यंत पोचलेत तिथे पोलिस पोचले.
ॲम्प्लिफायरसह विकत घेणाऱ्यालाही साडेदहापर्यंत उचलून आणले. ते बघताच बापलेकीचे डोळे पाणावले. मुंबई पोलिसांच्या कर्तबगारीने ऊर भरून आला अन् दुरुस्तीला नेले. दोन तासांचा हे नाट्यमय थरार बघायला मिळाला.
दरम्यान, सायंकाळी सहाला दत्तात्रय पाटील पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. त्यांना पेढे भरविले. बुके देऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजा बिडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस हवालदार संजय तळेकर, पोलिस कर्मचारी दीपक आहेर व संदीप बेंडकुळे यांचा सत्कार करून आभार मानले.
पप्पा, जे मशिन दुरुस्तीला आणलं तेच हरवलं ना..!
मशिन हरवल्यानंतर कान्हू डोळ्यात आसवे आणून म्हणाली, ‘पप्पा, जे मशिन दुरुस्तीला आणलं तेच हरवलं ना..! आता काय करायचं?’ पाटील यांनी सापडेलच, असा आत्मविश्वास व्यक्त केल्याने तिला दिलासा मिळाला होता. मशिन सापडणे अन् दुरुस्तीला टाकल्यानंतर बापलेकीने जिवाची मुंबईही केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.