Dhule News: येथील युवकांची वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व भरती होण्याची भरारी सुरूच असून, नुकतीच दोन युवकांची इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलात निवड झाली.
शरद दिनेश माळी व चेतन श्रीराम बडगुजर यांनी मोठी मेहनत घेऊन यश मिळविले. (Selection of two youths in Indo Tibetan Border Force dhule news)
चेतन बडगुजर व शरद माळी हे दोन्ही युवक अत्यंत गरीब परिवारातील असून, चेतनचे वडील हयात नाहीत. शरदचे वडील शेतकरी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आवश्यक व्यायामाला अभ्यासाची जोड देत त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांची निवड झाल्याचे समजताच गावातील युवकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली.
येथील युनियन बँकेचे शाखेचे व्यवस्थापक श्रीधर राऊत, उपशाखाप्रमुख गौरव नागदा, कृषी अधिकारी श्यामसुंदर शेडगे, खालिद शेख, पंकज बागूल, नंदाणेचे उपसरपंच ज्ञानेश्वर मिस्तरी, नाना देसले यांनी त्यांचा सत्कार केला.
काँग्रेसचे गटनेते अविनाश महाजन, सरपंच रंजना मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्यामलाल मोरे, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, पराग देशमुख, किशोर पावनकर यांनी अभिनंदन केले.
दरम्यान, मे २३ मध्ये येथील शैलेश निळकंठ पाटील, शरद भगवान माळी, काशीनाथ शांतिलाल सूर्यवंशी, भावेश हरिदास बडगुजर, शिवम कैलास लोहार, शुभम नामदेव बडगुजर हे सहा युवक एकाच वेळी व दिवशी सीमा सुरक्षा दलात भरती झाले. याशिवाय काही सैन्य, पोलिस दलात तथा उच्च पदावरही भरती झाले. या पार्श्वभूमीवर येथे युवकांसाठी मैदान व अभ्यासिका व्हावी, अशी मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.