Nandurbar: निःस्वार्थपणे तहानलेल्यांना तृष्णा भागविण्याचे कार्य; पाटील यांची 10 वर्षांपासून स्वखर्चाने पाणपोई
Nandurbar : अनेक व्यक्ती, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था प्रसिद्धी मिळविण्याकरिता मोठा गाजा-वाजा करीत सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करतात. परंतु, काही दिवसापुरतेच पाणपोईच्या माठात पाणी असते, पाणपोई कधी बंद होते हे कुणाला कळत सुद्धा नाही.
मात्र मोड (ता. तळोदा) येथील शेतकरी मानक पाटील निःस्वार्थपणे मागील दहा वर्षांपासून तहानलेल्या वाटसरुंची तृष्णा भागविण्याचे कार्य करीत आहेत. (Selflessly quenching thirst of thirsty manak Patil drinking water for 10 years at own expense Nandurbar news)
स्वार्थासाठी समाजकारण व समाजकारणातून राजकारण करणारे काही नेते तसेच स्वयंघोषित समाजसेवक यांना भर उन्हाळ्यात शहरासह तालुक्यातील गावो-गावी नागरिकांचा सोयीसाठी पाणपोई लावण्याचा विसर पडत चालला आहे.
मात्र तळोदा तालुक्यातील मोड येथील एक शेतकरी निःस्वार्थपणे मागील दहा वर्षांपासून स्वखर्चाने पाणपोई थाटत आहे. सध्या उन्हाचा पारा सर्वत्र वाढला आहे. त्यात जिव्हाची लाही लाही होत आहे.
मोड ते बोरद या चार किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर पायपीट करणारे प्रवासी, गुरे चारणारे, शेतमजुरी करणारे या रस्त्याने ये-जा करतात. रस्ता अंतर्गत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
त्यामुळे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना हॉटेलसह दुकानाचा आधार घेऊन विकतचे पाणी पिण्याची वेळ येते. हे लक्षात घेत उन्हाळ्यात वाटसरूची तहान भागावी लागत असल्याने शेतात पाणपोईची सोय केली आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मानक पाटील हे दरवर्षी उन्हाळ्यात स्वखर्चाने माठ विकत आणतात व पाणपोई सुरू करतात. मागील दहा वर्षापासून स्वतः ते पाणपोई चालवत आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाही वाजा-गाजा न करता ते माठ आणून रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर ठेवतात. आणि त्या दिवसापासून नित्यनियमाने दररोज सकाळ, दुपार व सायंकाळ असे तीनवेळा ते न चुकता पाण्याचे माठ भरतात.
"उन्हाळ्यात अनेकदा वाटसरू पिण्याच्या पाण्याच्या शोधात शेतात येत होते. त्यामुळे शेतातील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवले, तर वाटसरुंची तहान भागेल हा विचार मनात आला. त्यानुसार मागील दहा वर्षांपासून सदर पाणपोई चालवीत आहे. यामुळे एक वेगळे आत्मिक समाधान मिळत असून तहानलेल्यांना पाणी पाजणे यापेक्षा मोठे कार्य कोणतेच नाही."
- मानक पाटील, शेतकरी, मोड.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.