Women Special Bus : राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात सरसकट ५० टक्के सूट दिल्यानंतर या योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातच आता देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी धुळे आगारातून स्वतंत्र बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. दर रविवारी नांदुरी, त्र्यंबकेश्वर, रेणुकामातेच्या दर्शनासाठी ही सेवा आहे. दरम्यान, महामंडळाच्या धुळे विभागाच्या ताफ्यात दहा नव्याकोऱ्या बस दाखल झाल्या.
अधिकाऱ्यांच्या हस्ते बसचे पूजन करून या नवीन बससेवेचा शुभारंभ झाला. (separate bus for women for Devdarshan New 10 buses inducted into fleet dhule news)
राज्य परिवहन महामंडळाच्या महामंडळाच्या धुळे विभागाच्या ताफ्यात नुकत्याच दहा नवीन बस दाखल झाल्या. यातील पाच बस नाशिक बायपास तर पाच बस पुणे मार्गावर धावणार आहेत. १ मेपासून धुळ्याहून विनाथांबा पुणे बस सुरू होईल.
रोज सकाळी साडेनऊला ही बस धुळ्याहून सुटेल. बायपासमार्गे पुणे जाईल. त्यामुळे थेट पुणे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल. दरम्यान, महिलांसाठी दर रविवारी देवदर्शनासाठी स्वतंत्र बससेवाही उपलब्ध करण्यात येणार आहे. महिला प्रवाशांची संख्या ४५ झाल्यानंतर ही बस सुटेल.
नवीन बसला साधेच भाडे
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात नवीन बस दाखल झाल्यानंतर विभाग नियंत्रक विजय गिते व विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनी स्वतः हातात बसचे स्टिअरिंग घेऊन बससेवेचा शुभारंभ केला. धुळ्याहून नाशिक व पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
नवीन प्राप्त बसमुळे पुणे व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास सुकर होईल. ताफ्यात दाखल सर्व नवीन बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साधे प्रवासभाडे आकारले जाणार आहे. तसेच सर्व सवलती लागू असतील.
दहा नवीन बसेसमुळे धुळे विभागातील बस संख्या आता १३१ झाली आहे. नवीन बसपैकी पाच बस नाशिक बायपास तर पाच बस पुणे मार्गावर धावतील. पुढच्या टप्प्यात आणखी नवीन बस दाखल होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विभाग नियंत्रक श्री. गिते, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. देवरे, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) पंकज देवरे, आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज, अभियंता पंकज महाजन, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय भांडार अधिकारी श्री. पोतदार, सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्मराज पाटील, श्री. चित्ते, सांख्यिकी अधिकारी सूरज माळी आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.