Dhule News : वृद्ध पित्याचा सांभाळ करीत कन्येकडून सेवा; मुलगा नसलेल्या दांपत्यांसमोर आदर्श

Mrs. Maltibai Shah
Neha shah
Mrs. Maltibai Shah Neha shahesakal
Updated on

Dhule News : मुलगा नाही म्हणून काय झाले? मुलगीच त्यांचा मुलगा बनली... आयुष्यातील अखेरच्या काळात तिनेच त्यांचा सांभाळ केला... आणि तिनेच त्यांच्यावर अग्निसंस्कार केले... यात तिच्या पतीसह सासूनेही तेवढीच साथ देत या कुटुंबाने मुलगा नसलेल्या दांपत्याच्या मुलीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.(Service from daughter taking care of aged father in dhule news)

शिंदखेडा शहरातील नेहा परेश शाह असे या मुलीचे नाव, तर श्रीमती मालतीबाई शाह असे सासूबाईंचे नाव... चोपडा येथील दीपक रतनलाल गुजराथी यांना मुलगा नाही. नेहा या एकमेव कन्या आहेत.

दीपक गुजराथी हे शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक होते. पत्नीच्या अकाली निधनानंतर ते एकटेच राहायचे. निवृत्तीनंतरही त्यांनी घरी एकटेच राहणे पसंत केले. मात्र, वय वाढत गेले, पंच्याहत्तरी गाठली, हात-पाय काम करीत नव्हते, शरीर थकले, अशा वेळी माझे कसे होईल, या चिंतेने ते ग्रासले.

मात्र, त्यांच्या कन्या नेहा, जावई परेश आणि विहीणबाई त्यांच्यासाठी धावून आले. त्यांनी गुजराथी यांना सहा महिन्यांपूर्वी शिंदखेडा येथे आपल्या घरी आणले. त्यांची सेवा केली. त्यांच्याशी नियमितपणे गप्पा होऊ लागल्या. त्यांना कधीही मुलाची खंत जाणवू दिली नाही.

दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली. वैद्यकीय उपचार झाले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यातच त्यांचे निधन झाले. निधनानंतर अग्निसंस्कार कुणी करायचे, यावर अनेकांनी धर्म परंपरेनुसार विविध मार्ग सुचविले.

Mrs. Maltibai Shah
Neha shah
Dhule News: ही दोस्ती तुटायची न्हाय..! काळगाव रस्त्यावर दिलदार श्वानाचा मित्रासाठी शोक

मात्र, शाह कुटुंबांनी कुणाचेही न ऐकता मुलीने आतापर्यंत मुलाचे कर्तव्य पार पाडले, तेव्हा आताही त्याच ते कर्तव्य पार पाडतील, असा निर्णय घेतला आणि त्यानुसार मुलीनेच अग्निसंस्कार केले. याद्वारे मुलगा नसलेल्या दांपत्यांच्या मुलीसमोर त्यांनी नवा आदर्श निर्माण केला.

''सुनेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे व पुढेही राहील. शेवटी माणुसकी महत्त्वाची असते.''- मालतीबाई शाह (विहीणबाई)

''वडिलांनी गरिबीत दिवस काढून मला शिकविले, घडविले. मी त्यांना कसे वाऱ्यावर सोडू? पती व आईसमान सासूबाई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला त्यांचा अभिमान आहे.''- नेहा शाह (कन्या)

Mrs. Maltibai Shah
Neha shah
Dhule News : मुंडेंची घोषणा...बोलाचा भात अन्‌ कढी; पीकविमा रकमेशिवाय दिवाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.