Nandurbar Agriculture News : भोरटेक शिवारात 7 एकर ऊस खाक

शहादा तालुक्यातील भोरटेक शिवारात शॉर्टसर्किट होऊन सुमारे सात एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच दुपारच्या सुमार घडली.
Sugarcane fire in Bhortek Shivara.
Sugarcane fire in Bhortek Shivara.esakal
Updated on

Nandurbar News : शहादा तालुक्यातील भोरटेक शिवारात शॉर्टसर्किट होऊन सुमारे सात एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच दुपारच्या सुमार घडली. यात आठ लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

महावितरणच्या दुर्लक्षामुळे उसाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून, भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली. (Seven acres of sugarcane burnt down in Bhortek Shivara Nandurbar agriculture News)

शहादा तालुक्यातील भोरटेक येथील विजयाबाई सुरतसिंह पवार यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात आग लागली. यात सुमारे आठ लाख १७ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

उसाच्या शेतात आग लागल्याचे समजताच विजयाबाई पवार यांची मुले, नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे सात एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.

Sugarcane fire in Bhortek Shivara.
Nandurbar Agriculture News : तळोदा तालुक्यात शेतकरी मजुरांमध्ये फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला; खर्चही काढणे अवघड

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतात वीजखांब अनेक दिवसांपासून वाकलेला होता. वीजतारा लोंबकळलेल्या होत्या. संबंधित शेतकऱ्यांनी मंदाणे येथील विद्युत उपकेंद्रात वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारदेखील केल्याचे सांगण्यात आले.

मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. सुदैवाने बाजूला धर्मेंद्र रामसिंग पवार यांच्या शेतातील तीन एकर ऊस वाचला आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. असे असले तरी आगीचे खरे कारण शोधण्याची गरज व्यक्त करण्यात येत असून, भरपाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Sugarcane fire in Bhortek Shivara.
Nandurbar News : शासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख कामातून उद्दिष्ट साध्य करावे : राधाकृष्ण गमे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.