Dhule News : स्टेशन रोड भागातील ग. स. कॉलनी हिरे भवनसमोरील रस्त्यावर गटाराचे पाणी जमा होऊन दुर्गंधी पसरली आहे.
या समस्येमुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, तक्रार करूनही महापालिका त्याची दखल घेत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. (Sewage water accumulated on road and bad smell spread dhule news)
शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील ग. स. कॉलनीत हिरे भवनसमोरील रस्त्यावर गटाराचे पाणी रस्त्यावर जमा झाले आहे. या वसाहतीत ड्रेनेज लाइन खराब झाल्याने गटाराचे पाणी थेट रस्त्यावर आले असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही घरांच्या गेटजवळच पाणी जमा झाल्याने त्या-त्या कुटुंबातील सदस्यांना या घाण पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडण्याची भीती आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे गटाराचे पाणी उडते. त्यामुळे ते कुणाच्या अंगावर पडून वाद निर्माण होण्याची शक्यताही आहे. तसेच पावसाळाही सुरू झाल्यामुळे जोरदार पाऊस झालाच तर तेथील परिस्थिती आणखीच गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.
वेळीच गटारातील घाण काढून गटार प्रवाहित करावी, रस्त्याची स्वच्छता करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेकडे या समस्येबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संतापही व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.