Market Committee Election : निवडणूक रणसंग्राम; तिसऱ्या दिवशी 102 अर्जांची विक्री; 11 अर्ज दाखल

shahada market committee election
shahada market committee electionesakal
Updated on

शहादा (जि.नंदुरबार) : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १०२ अर्जांची विक्री होऊन ११ अर्ज दाखल झाले.

निवडणुकीचे चित्र कसे असेल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात असले, तरी अद्याप कोणत्याही गटाने अधिकृत पॅनलची घोषणा केली नसल्याने माघारीअंती निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. (shahada market committee election third day of filing of nominations 102 applications were sold and 11 application filed nandurbar news)

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तत्पूर्वी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक दीपक पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत स्वतंत्र बैठका घेऊन निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.

या वेळी दोन्ही बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचा आग्रह कायम आहे; परंतु अद्यापही नेत्यांच्या गोटात वरकरणी शांतता दिसत असली तरी अंतर्गत मात्र घडामोडी वेगाने घडत असल्याचे कार्यकर्त्यांकडून समजते.

ग्रामीण भागात चर्चा बाजार समितीची

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तसेच विविध संस्थांचे सदस्य पदाधिकारी मतदार असल्याने ग्रामीण भागात निवडणुकीविषयी चर्चा आणि गप्पा रंगत आहेत. यात आपापल्या नेत्यांची बाजू सांभाळत चर्चेतून आरोप-प्रत्यारोपही करण्यात येत आहेत. त्यामुळे बाजार समिती तालुक्याच्या ठिकाणी असली तरी ग्रामीण भागात मात्र माझाच नेता योग्य असल्याचे मत कार्यकर्ते मांडत आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

shahada market committee election
Ajit Pawar : ''सरकारने अनुदान देताना थट्टा करु नये'', अजित पवारांचे सरकारला खडे बोल

पाटीलद्वयींच्या भूमिकेकडे लक्ष

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीवर दीर्घकाळ (स्व.) पी. के. अण्णा पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. प्रदीर्घ कालखंडानंतर निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दीपक पाटील व अभिजित पाटील या दोन्ही पाटलांकडून पॅनल उभे केले जाते की बिनविरोध निवडणूक केली जाते हा येणारा काळ ठरवेल; परंतु सध्या तरी संपूर्ण तालुक्याचे पाटीलद्वयींचा भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

"निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न कायम आहे. अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुक आहेत. काही इच्छुकांनी परस्पर उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत कोणी कोणी अर्ज दाखल केले व किती अर्ज दाखल झाले हे स्पष्ट झाल्यानंतर माघारीसाठी बैठक होईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल, मात्र बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याचा शंभर टक्के प्रयत्न राहील." -प्रा. मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

"उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती आखली जाईल." -अभिजित पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती

shahada market committee election
Dhule Market Committee Election : तिसऱ्या पर्यायाने समीकरण बदलणे शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.