शिरपूर (जि. धुळे) : खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) बळ मिळणार आहे.
धर्मांध शक्तींविरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ३०) होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी केले. (sharad Pawar visit to shirpur gives NCP strength Anil Gote Dhule political Latest marathi news)
खासदार पवार यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता. २८) झालेल्या पक्षाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते एन. सी. पाटील, माजी तालुकाध्यक्ष रमेश करनकाळ, शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन, शोभा आखाडे, ज्योती चौधरी, डॉ. सोमनाथ चौधरी, दत्तू पाडवी, पंंडित पावरा, अश्फाक शेख, किशोर पाटील, मुन्ना पाटील, राकेश थोरात, उदय पाटील, अल्पसंख्याक सेलचे वाजिद शेख, जावेद शेख, बाळासाहेब पाटील, गौरव पाटील, गणेश देवरे, अनिल माळी, सुरेश माळी, छोटू माळी, नरेंद्र करनकाळ, संजय बडगुजर, दीपक माळी, रिजवान शेख, कामगार संघटनेचे शिवाजीराव बोरसे, हिरालाल कोळी, इमरान शेख आदी उपस्थित होते.
दुचाकी रॅली
शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन म्हणाले, की शिरपुरातून हजारो कार्यकर्ते धुळे येथे उपस्थित राहणार आहेत. २०० दुचाकीस्वारांचा समावेश असलेली रॅली शिरपूरहून धुळ्याला जाणार आहे. ५० वाहनांतून पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना होणार आहेत.
त्यांच्यासाठी भोजन व्यवस्थाही केली आहे. एन. सी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश करनकाळ यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा सादर केला. हेमराज राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.