Dhule News: शिंदखेडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम उपविभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता, महिला व बालविकास एक व दोन बालविकास अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अतिरिक्त कार्यभार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. (Shindkheda Panchayat Samiti work is on incharge dhule news)
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीचा दुवा असलेल्या पंचायत समितीचा कार्यभार अशा पद्धतीने चालत असल्याने सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर चकरा माराव्या लागत असल्याने वेळेसह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिंदखेडा पंचायत समितीची अधिकारी व कर्मचारी अशी एकूण एक हजार ४९ मंजूर, तर ८३६ पदे कार्यरत असून, २१३ पदे रिक्त असल्याने यांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकारी व कर्मचारी पाहत असून, त्यांच्यावर भार पडत असल्याने विकासकामांना ‘खीळ’ बसत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना काही कर्मचारी इतर ठिकाणी डेपोडेशनवर देण्यात आले आहेत. त्यांना परत बोलवणे गरजेचे आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील-जाधव यांचे माहेर कमखेडा व सासर नेवाडे हे शिंदखेडा तालुक्यातील, मालपूर येथील महावीरसिंह रावल हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती व नरडाणा येथील संजीवनी सिसोदे या महिला व बालकल्याण सभापती तालुक्यातील तरी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
"शिंदखेडा येथील महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प एक व दोन येथील सीडीपीओ यांच्या रिक्त जागा आहेत. त्या भरण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. राज्य शासन जोपर्यंत सीडीपीओ यांच्या नियुक्त्या करत नाही तोपर्यंत प्रभारी अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार असणार आहे.'' -संजीवनी सिसोदे, महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद, धुळे
रिक्त पदे
संवर्ग मंजूर कार्यरत रिक्त
अधिकारी वर्ग
गटविकास अधिकारी १ ० १
सहाय्यक गटविकास अधिकारी १ ० १
गटशिक्षणाधिकारी १ ० १
सीडीपीओ (प्रकल्प एक व दोन) २ ० २
उपअभियंता (बांधकाम) १ ० १
उपअभियंता (लघुसिंचन) १ ० १
उपअभियंता (पाणीपुरवठा) १ ० १
पशुधन विकास अधिकारी १ ० १
प्रशासन विभाग
कनिष्ठ सहाय्यक ३२ ३१ १
कृषी अधिकारी १ ० १
विस्ताराधिकारी (कृषी) ३ २ १
विस्ताराधिकारी (सांख्यिकी) १ ० १
वाहनचालक १२ २ १०
परिचर ७९ ५५ २४
आरोग्य विभाग
विस्ताराधिकारी १ ० १
औषधनिर्माण अधिकारी ८ ७ १
आरोग्य सहाय्यक (पुरुष) १० ८ २
आरोग्य सहाय्यक (महिला ) ८ ६ २
आरोग्यसेवक (पुरुष) २४ १८ ६
आरोग्यसेवक (महिला) ४७ २० २०
बांधकाम उपविभाग
शाखा/कनिष्ठ अभियंता ९ ४ ५
स्थापत्य अभियंता सहाय्यक १७ ६ ११
आरेखक १ ० १
लघुसिंचन उपविभाग
शाखा/कनिष्ठ अभियंता ५ ३ २
स्थापत्य अभियंता सहाय्यक १ ० १
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग
शाखा/कनिष्ठ अभियंता ६ २ ४
ग्रामपंचायत विभाग
ग्रामविकास अधिकारी १७ ११ ६
ग्रामसेवक ८७ ८० ७
पशुसंवर्धन विभाग
सहाय्यक विकास अधिकारी ३ २ १
पशुधन पर्यवेक्षक ११ ८ ३
महिला व बालविकास प्रकल्प एक/दोन
पर्यवेक्षिका (प्रकल्प एक) ७ ३ ४
वरिष्ठ सहाय्यक (लेखा, प्रकल्प एक) १ ० १
पर्यवेक्षिका (प्रकल्प दोन) ७ २ ५
शिक्षण विभाग
विस्ताराधिकारी ८ ४ ४
केंद्रप्रमुख १५ ६ ९
मुख्याध्यापक २५ १५ १०
विषय शिक्षक १५ ७ ८
उपशिक्षक ५५८ ४९९ ५९
एकूण १,०४९ ८३६ २१३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.