Shivsena : रस्त्याची चाळण, दुरुस्तीसाठी तरतूद करा; शिवसेनेची मागणी

Shiv Sena office bearers, workers and citizens protesting between Datta Mandir and Jakarta Bhavan in the city.
Shiv Sena office bearers, workers and citizens protesting between Datta Mandir and Jakarta Bhavan in the city.esakal
Updated on

धुळे : शहरातील अंत्यत महत्त्वाचा पत्रकार भवन ते दत्त मंदिर या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली आहे. मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याची डागडुजी झाली नाही. महापालिकेने हा रस्ता तयार करावा, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी मागणी शिवसेनेने केली. (Shiv Sena demands Municipal Corporation should repair bad road and rebuild provision in budget dhule news)

पत्रकार भवन, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिमखाना, विक्रीकर भवन, पोलिस ट्रेनिंग सेंटर, महत्त्वाची रुग्णालये या रस्त्यावर असताना तसेच, धान्य गोदामावर धान्य घेण्यासाठी शेकडो वाहनांची या रस्त्यावरून दररोज ये-जा सुरू असते. पन्नासवर कॉलनी परिसरातील नागरिकांचा दररोज वापर या रस्त्यावरून वापर असतो.

असे असताना या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. महापालिकेने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारासह रस्त्याची दुरुस्ती करावी, त्यासाठी महापालिकेच्या नवीन अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी मागणी शिवसेनेने केली. या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नागरिकांसोबत या रस्त्यावर निदर्शने केली.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Shiv Sena office bearers, workers and citizens protesting between Datta Mandir and Jakarta Bhavan in the city.
Nashik News : आशा, गटप्रवर्तकांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता रद्द

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक देवीदास लोणारी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, महादू गवळी, संजय जवराज, प्रवीण साळवे, छोटू माळी, कैलास मराठे, प्रसाद सोनार, दीपक परदेशी, अॅड. पुजांराम सानप, नितीन जगताप, अक्षय पाटील, शुभम रणधीर, गुलाब धोबी, सागर भडागे, सागर निकम, सागर सैंदाणे, तेजस सपकाळ आदींचा या आंदोलनात सहभाग होता.

Shiv Sena office bearers, workers and citizens protesting between Datta Mandir and Jakarta Bhavan in the city.
Agriculture News : 10 कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित; कृषी विभागाकडून कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.