Dhule News : साक्रीत शिवसेना तालुकाप्रमुखांचे वाढदिवसाचे Banner फाडल्याने तणाव

Sakri: Shiv Sena taluka chief Pankaj Marathe, office bearers and activists present met police inspector Ravindra Deshmukh in connection with the demolition of the religious program banner along with the happy birthday banner and discussed the matter of taking strict action against the concerned social worker.
Sakri: Shiv Sena taluka chief Pankaj Marathe, office bearers and activists present met police inspector Ravindra Deshmukh in connection with the demolition of the religious program banner along with the happy birthday banner and discussed the matter of taking strict action against the concerned social worker.esakal
Updated on

साक्री : शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांचे वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर व धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बुधवारी (ता. २८) सकाळी परिसरासह साक्री शहरात काहीसा तणाव निर्माण झाला होता.

मात्र श्री. मराठे यांच्यासह पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(Shiv Sena Taluka Pramukh Birthday Banner Tearing Up quarrel in sakri dhule news)

Sakri: Shiv Sena taluka chief Pankaj Marathe, office bearers and activists present met police inspector Ravindra Deshmukh in connection with the demolition of the religious program banner along with the happy birthday banner and discussed the matter of taking strict action against the concerned social worker.
Nashik News | सिडकोतील वरद विनायक गणपती उद्यान : खेळण्या तुटलेल्या अवस्थेत; ग्रीन जिम फक्त नावाला

शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी न्यू इंग्लिश स्कूलसमोर, पिंपळनेर रस्त्यालगत, सुरत-नवापूर रस्त्यालगत तसेच वंजार तांड्याजवळ शुभेच्छापर बॅनर लावले होते.

या बॅनरवर महापुरुषाचेही छायाचित्र होते. हे बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडल्याचे सकाळी निदर्शनास आले. बॅनरवर चिखलफेकही झाली. तसेच या बॅनरच्या समोरच असलेले एका धार्मिक कार्यक्रमाचे बॅनरदेखील फाडलेले असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Sakri: Shiv Sena taluka chief Pankaj Marathe, office bearers and activists present met police inspector Ravindra Deshmukh in connection with the demolition of the religious program banner along with the happy birthday banner and discussed the matter of taking strict action against the concerned social worker.
Jalgaon News : Thirty First वरील नियंत्रणासाठी 2 पथके

कळंभीर येथे होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भंडारा कार्यक्रमाचे हे बॅनर होते. या घटनेची माहिती श्री. मराठे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख हे देखील पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी मोठी गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पंकज मराठे यांनी कार्यकर्त्यांना शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केल्याने तणाव काहीसा कमी राहिला.

Sakri: Shiv Sena taluka chief Pankaj Marathe, office bearers and activists present met police inspector Ravindra Deshmukh in connection with the demolition of the religious program banner along with the happy birthday banner and discussed the matter of taking strict action against the concerned social worker.
Nashik News | सिडकोतील वरद विनायक गणपती उद्यान : खेळण्या तुटलेल्या अवस्थेत; ग्रीन जिम फक्त नावाला

दरम्यान, या प्रकारानंतर पंकज मराठे यांनी कार्यकर्त्यांसह साक्री पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक देशमुख यांनी घडलेल्या घटनेची चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई आश्वासन दिले व सर्वांनी शांतता ठेवून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्यासह नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक बाळा शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज गवळी, अशोक गिरी महाराज, गोटू जगताप, दीपक गुरव, सतीश मोहिते, नितीन गुप्ता आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Sakri: Shiv Sena taluka chief Pankaj Marathe, office bearers and activists present met police inspector Ravindra Deshmukh in connection with the demolition of the religious program banner along with the happy birthday banner and discussed the matter of taking strict action against the concerned social worker.
Jalgaon News : 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.