Dhule Municipality News : सत्ताधारी भाजपला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खुले आव्हान

महापालिकेतील भाजपचा पाच वर्षांतील एकहाती सत्ताकाळ ३१ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. यानंतर प्रशासकाची नियुक्ती होईल.
A Shiv Sena official giving a statement to Pratibha Chaudhary regarding the problems in the city.
A Shiv Sena official giving a statement to Pratibha Chaudhary regarding the problems in the city.esakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिकेतील भाजपचा पाच वर्षांतील एकहाती सत्ताकाळ ३१ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. यानंतर प्रशासकाची नियुक्ती होईल.

पंचवार्षिक काळातील रखडलेल्या १५ प्रश्‍नांची उत्तरे सत्ताधारी भाजपने जनतेला द्यावीत, असे खुले आव्हान शिवसेनेच्या ठाकरे गटाने गुरुवारी (ता.२१) महापौर प्रतिभा चौधरी यांच्यामार्फत दिले.(Shiv Sena Thackeray group has openly challenged ruling BJP jalgaon municipality news)

चार वर्षे अकरा महिने आणि २१ दिवसांत महापालिकेच्या बोटावर मोजण्याइतक्या महासभा झाल्यात. मनपाचा साडेचार वर्षांचा कालावधी महापौरऐवजी भाजपच्या माजी शहर जिल्हाध्यक्षांनी चालविला. अशात गेल्या साडेचार वर्षांतील धुळेकरांच्या मनातील अनेक प्रश्‍न जैसे- थे आहेत.

भाजपसाठी पंधरा प्रश्‍न

- धुळेकरांना रोज पाणीपुरवठा करू या आश्‍वासनाचे काय झाले.

- पाणीपुरवठा योजना पूर्ण का झाली नाही.

- अमृत योजनेतील अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना अद्यापही क्षमतेने कार्यान्वित का झाली नाही.

- अमृत मलनि:सारण योजनेतील गैरप्रकार व अपूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामाचे काय.

- पाणीपुरवठा योजनेंतर्गत नऊ जलकुंभ उद्घाटन अभावी कोरडेठाक का पडून आहेत.

- कचरा डेपोचे आयुष्य संपले तरी नवीन स्थान निर्धारण का होऊ शकले नाही.

- खाऊ गल्ली, टॉवर बगीचा, नदी काठावरील नवउद्यान, बांबू घोटाळ्यातील गैरकारभाराचे काय.

- १७ कोटी खर्चून एलइडी दिवे अद्यापही शहरात पूर्णतः का लागले नाहीत.

- बंद व नवीन पथदिवे शहरात लागत नसल्याने अर्धेहून अधिक शहर रात्री अंधारात का?

A Shiv Sena official giving a statement to Pratibha Chaudhary regarding the problems in the city.
Dhule Municipal Corporation Fraud: आस्था घोटाळा प्रकरणी अहवाल मागविला; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश

- आस्था संस्थेचा ठेकेदार, स्वयंभू संस्थेचा ठेकेदार यांचा गैरकारभार, मनपाच्या कोट्यवधीच्या जागा घशात घालणाऱ्या भूमाफिया, देवपूरमधील भाजी मंडईच्या आरक्षीत जागेत दस्तावेजात गडबड करणाऱ्यांवर अद्याप गुन्हे का दाखल नाहीत.

- बीओटी तत्त्वावरील गल्ली नंबर सहामधील पाटील कॉम्प्लेक्स, मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत कॉम्प्लेक्सच्या भाडेवसुलीचा प्रश्न.

- परस्पर गाळे हस्तांतरावर संबंधित ठेकेदार बोरसे ब्रदर्सवर गुन्हे का दाखल केले नाहीत.

- राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिर, स्नेहनगरचा जलतरण तलाव यात ठेकेदारांनी चालविलेल्या मनमानी विरोधात कार्यवाही का नाही.

- मालमत्ता कर व पाणीपुरवठा कराबाबत कुठलाही ठराव न करता झालेल्या मनमानी करवाढ संबंधी भूमिका काय.

- नगरउत्थान योजनेतील रस्ते, गटारी, पथदिवे, संरक्षण भिंती, ओपन स्पेस, बगीचे आदींत झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई संदर्भात भूमिका काय.

-पंचवार्षिक काळातील कोट्यवधी विकास कामांचे ऑडिट करणे व त्यातील गैरप्रकार, टक्केवारीच्या संस्कृतीविषयी भूमिका काय.

- महापालिकेचे विशेष लेखा परिक्षण करणे, कर्मचारी व शिक्षक यांचा सातव्या वेतन आयोगाचा फरक आस्थापना व प्रशासनातील सुस्पष्टता आणणे.

A Shiv Sena official giving a statement to Pratibha Chaudhary regarding the problems in the city.
Dhule Municipal Corporation : महापालिकेतील बोगस भरतीची चौकशी करा; शिवसेना ठाकरे गट

ठरावावर ठराव कसे? महापालिकेत गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे ठराव करण्यात येत आहेत. ते घाईघाईने केले जात आहेत. महासभेसाठी शेवटचे दहा दिवस आहेत. यापूर्वी जितके ठराव झाले नाहीत, तितके ठराव या महिन्यात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकापाठोपाठ एक महासभा घेतल्या जात आहेत.

संबंधित विषय प्रशासनाकडून येत आहेत किंवा नाहीत याबाबत कोणतीही माहिती जनतेला होत नाही. इतके विषय येण्यामागचे कारण समजून येत नाही. महासभेद्वारे चुकून एखादे बेकायदेशीर काम झाल्यास किंवा महापालिकेचे नुकसान झाल्यास त्यास महापौर जबाबदार राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे.

A Shiv Sena official giving a statement to Pratibha Chaudhary regarding the problems in the city.
Dhule Municipality News : संकुलाच्या उत्पन्नावर साडेचार वर्षांनंतरही उत्तर सापडेना; सभापतींचे ‘हात वर’

जाहीर खुलासा करावा सत्ताधारी भाजपला शेवटच्या दहा दिवसात महासभा घ्यायची झाल्यास शिवसेनेने जनहितासाठी उपस्थित पंधरा प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी घ्यावी, असेही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील.

डॉ. सुशील महाजन. भरत मोरे, मच्छिंद्र निकम, प्रफुल्ल पाटील, सुनील पाटील, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, छोटू माळी, शिवाजी शिरसाळे, अमजद पठाण, भटू गवळी, दिनेश पाटील, अजय चौधरी, नितीन जडे, कैलास कांजरेकर, सलीम खान, नासिर पिंजारी, अमोल ठाकूर, अनिल शिरसाट, तेजस सपकाळ आदींनी म्हटले आहे.

A Shiv Sena official giving a statement to Pratibha Chaudhary regarding the problems in the city.
Dhule Municipality News : 7 दिवसात साडेसातशे हरकती दाखल; सुधारित मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()