म्हसदी (जि. धुळे) : सिकलसेल (Sickle Cell) हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग आहे. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही तो आढळतो. एका गुणसूत्रातील जनुकात बदल झाल्यास मलेरियापासून बचाव होतो, परंतु असा बदल झालेले दुसरेही गुणसूत्र असल्यास मात्र रोगच उत्पन्न होतो. (sickle cell coordinator Vilas Varude statement about sickle cell disease in India dhule news)
भारतातील सिकलसेलचा रोग जगाच्या इतर भागातील रोगापेक्षा कमी तीव्रतेचा असल्याचे मत धुळे जिल्ह्याचे सिकलसेल समन्वयक विलास वारुडे यांनी व्यक्त केले.
येथील (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमानुभव शिबिर धनदाईदेवी मंदिर परिसरात सुरू आहे. शिबिरात सिकलसेल जनजागृतीपर समुपदेशन व सिकलसेल रक्त नमुने चाचणी शिबिरप्रसंगी श्री. वारुडे मार्गदर्शन करत होते.
अंग गारठणे, शरीरात पाण्याचे प्रमाण खूप कमी होणे, शरीराच्या तापमानात अचानक बदल होणे, प्राणवायूचा अभाव, जंतुसंसर्ग, अपुरे व अवेळी जेवण, शारीरिक श्रम, मानसिक तणाव यातून अंगदुखीचा त्रास जाणवतो. याच कारणांनी दोन सिकलसेलच्या रुग्णांमध्ये वेगवेगळे परिणामही पाहायला मिळत असल्याची माहिती सिकलसेल समुपदेशक दौलत मोरे यांनी दिली.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
शिबिरात ८५ स्वयंसेवकांची रक्त नमुने घेऊन सिकलसेलची चाचणी घेण्यात आली. तालुक्याचे सिकलसेल समन्वयक कांतिलाल चव्हाण आणि म्हसदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पवार, आरोग्य सहाय्यक पी. डी. देवरे, आशा वर्कर व आरोग्य सहाय्यक उपस्थित होते.
यादरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी भेट दिली. डॉ. सचिन नांद्रे यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधून शिबिरात मिळणाऱ्या सुविधा व शिबिरादरम्यान राबविले जात असलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन स्वयंसेवकांची उपस्थिती तपासली.
सिकलसेल समुपदेशन व रक्तचाचणी शिबिराचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश अहिरे यांनी केले. स्वयंसेवक अरबाज शाह याने सूत्रसंचालन केले. डॉ. बाबासाहेब मोताळे यांनी आभार मानले. व्यवस्थापन महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. वनिता पवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.