Tax Recovery News : चार आठवड्यांत 60 लाखांची करवसुली ; लिपिक सय्यद अली यांचा गौरव

Nandurbar: Collection Clerk Syed Wajid Ali Mushtaq Ali receiving felicitation from the then Chief Executive Pulkit Singh for collecting tax of 60 lakhs in four weeks in the municipality
Nandurbar: Collection Clerk Syed Wajid Ali Mushtaq Ali receiving felicitation from the then Chief Executive Pulkit Singh for collecting tax of 60 lakhs in four weeks in the municipalityesakal
Updated on

Nandurbar News : येथील पालिकेच्या थकबाकीदारांकडे जाऊन केवळ चार आठवड्यांत ६० लाख रुपयांची थकीत करवसुली केल्याने पालिकेचे वसुली लिपिक सय्यद वाजीदअली मुस्ताक अली यांचा पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नंदुरबार शहरातील मालमत्ताधारकांनी २०२२-२३ अखेरपर्यंत मालमत्ता कर व इतर कर भरलेला नसल्यामुळे मालमत्ता कर वसुलीबाबतची मोहीम १३ मे २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांचे निर्देश होते. (Sixty lakhs tax collection in four weeks Glory to Clerk Syed Ali Nandurbar News)

Nandurbar: Collection Clerk Syed Wajid Ali Mushtaq Ali receiving felicitation from the then Chief Executive Pulkit Singh for collecting tax of 60 lakhs in four weeks in the municipality
Jalgaon NCP News : संजय पवार अखेर राष्ट्रवादीतून बडतर्फ

त्यानुसार वसुली विभागातील वसुलीचा आढावा पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी घेतला असता नगर परिषदेची वसुली अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे जे थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस पुन्हा देणे तसेच वृत्तपत्रात जाहीर सूचना प्रसिद्धी करून मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आलेले होते.

मालमत्ता कर वसुलीची नोटीस मोहिमेची १३ एप्रिलपासून कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar: Collection Clerk Syed Wajid Ali Mushtaq Ali receiving felicitation from the then Chief Executive Pulkit Singh for collecting tax of 60 lakhs in four weeks in the municipality
Crime News : लग्नानंतरही गावातील मुलीवर प्रेम केलं पण जीवावर बेतलं; विवाहित तरुणाचा खून

नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या नोटिशीच्या मुदतीनंतर जे मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत, अशा मालमत्ता सील करून जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, पालिकेचे वसुली लिपिक सय्यद वाजीदअली मुस्ताक अली यांनी १३ एप्रिल ते १२ मे या कालावधीत एकूण ५९ लाख ३१ हजार ८२७ रुपयांची एवढी रक्कम थकबाकीदारांकडून वसूल केलेली आहे.

दरम्यान, सय्यद यांनी त्यांच्या भागातील मालमत्ता कर व इतर करवसुलीचे काम समाधानकारकरीत्या पूर्ण केल्याने पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते सय्यद यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यातही आपण सेवेत असेपर्यंत यापुढे चांगले काम करावे, अशी अपेक्षाही सिंह यांनी व्यक्त केली.

Nandurbar: Collection Clerk Syed Wajid Ali Mushtaq Ali receiving felicitation from the then Chief Executive Pulkit Singh for collecting tax of 60 lakhs in four weeks in the municipality
Education News : शाळेत न जाता देता येणार थेट परीक्षा; गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘मुक्त’ शिक्षणाची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.