Dhule Crime: परराज्यातून मद्याची तस्करी; 44 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

A team of State Excise Department along with suspects seized liquor stock during the operation on Songir-Chimthane road.
A team of State Excise Department along with suspects seized liquor stock during the operation on Songir-Chimthane road.esakal
Updated on

Dhule Crime : परराज्यातून होणारी विदेशी मद्यतस्करी रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाडाखेड (ता. शिरपूर) पथकाला यश आले.

पथकाने गस्तीदरम्यान सोनगीर-चिमठाणे रस्त्यावरील एका हॉटेलजनीक ४४ लाखांचा मद्यसाठा तसेच वाहन जप्त केले. (Smuggling liquor from abroad 44 lakh foreign liquor stock seized Dhule Crime)

A team of State Excise Department along with suspects seized liquor stock during the operation on Songir-Chimthane road.
Jalgaon Fraud Crime: कर्नाटकच्या भामट्याचा प्रौढास 25 लाखांचा चुना; नर्सरीच्या रोपांसाठी घेतली रक्कम

मुंबई-आग्रा महामार्गावरून परराज्यातून विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार १४ जुलैला हाडाखेड (ता. शिरपूर) सीमा तपासणी नाक्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गस्तीपथकाने सोनगीर-चिमठाणे रोडवर संशयित वाहनाची (एमएच-१५/जेसी-०४६९) तपासणी केली.

वाहनात परराज्यातील एकूण ७३० खोके विदेशी मद्य आढळले. कारवाईत ४४ लाखांचे विदेशी मद्य व १५ लाखांचे वाहन असा एकूण ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.

राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी, धुळ्याचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील निरीक्षक ए. पी. मते, दुय्यम निरीक्षक एस. ए. चव्हाण. पी. एस. धाईजे, बी. एस. चोथवे, ए. सी. मानकर, एस. एस. शिंदे, एस. एस. आवटे, एस. एस. गोवेकर, प्रशांत बोरसे, गोरख व्ही. पाटील, के. एम. गोसावी, केतन जाधव, डी. टी. पावरा, एस. एच. देवरे, एम. एस. धुळेकर, हेमंत पाटील, विजय नाहीदे, नीलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

A team of State Excise Department along with suspects seized liquor stock during the operation on Songir-Chimthane road.
Jalna Crime : जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी हद्दपारीचे प्रस्ताव निकालाच्या प्रतीक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.