धुळे : प्लॅस्टिक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठ्यांआड होणारी गुटख्याची तस्करी एलसीबीच्या (LCB) पथकाने उजेडात आणली.
साक्री शिवारात ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेत साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Smuggling of 12 lakh 18 thousand Gutkha under plastic waste and bundles of clothes dhule crime)
राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने गुजरातमधून तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार रविवारी (ता. २६) सुरत येथून दहिवेलकडून साक्रीकडे येणारा ट्रक (एमएच ४१, जी ७१६५) पोलिस पथकाने थांबविला. चालकाने शेख अस्लम शेख उस्मान (रा. न्यू आझादनगर, गल्ली क्रमांक ५, मालेगाव) असे नाव सांगितले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला ट्रकसह साक्री पोलिस ठाण्यात आणले.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
तपासणीत प्लॅस्टिक कचरा व कपड्यामध्ये ९८ हजार ४०० रुपयांचा विमल सुंगधित पानमसाला, तंबाखूचा साठा आढळला. त्यासह दहा लाखांचा ट्रक, पाच हजारांचा मोबाईल व एक लाख १५ हजारांचा प्लॅस्टिक कचरा व कपड्याचे गठ्ठे असा १२ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीनुसार संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. श्री. बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, सतीश पवार, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.