Dhule News : दुसऱ्यानेच काढला परस्पर पीकविमा! अजंगच्या शेतकऱ्याची तक्रार

Complainant farmers present in private farm regarding crop insurance.
Complainant farmers present in private farm regarding crop insurance. esakal
Updated on

Dhule News : अजंग (ता. धुळे) येथील शेतकऱ्याची एकीकडे पीकविमा मिळविण्यासाठी पायपीट सुरू असताना त्याच्या शेतावर दुसऱ्यानेच पीकविमा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (someone else has taken out crop insurance on another farmer farm dhule news)

त्यामुळे यंदा पीकविमा योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्यास आंदोलन करू, असा इशारा तक्रारदार शेतकरी तुळशीराम माळी व भाऊसाहेब माळी यांनी दिला.

तक्रारदार शेतकऱ्यांनी पत्रकात म्हटले आहे, की अजंग येथे तुळशीराम हरकू माळी व मुलगा भाऊसाहेब यांची दोन हेक्टर ३९ आर वडिलोपार्जित मिळकत आहे. वारसाहक्काने मिळालेली ही शेतजमीन दीर्घकाळापासून ते कसत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Complainant farmers present in private farm regarding crop insurance.
Crop Competition : देखण्या पिकांवर होणार बक्षिसांची खैरात! कृषी विभागाकडून पीक स्पर्धा

ही जमीन पितापुत्राच्या कब्जे व उपभोग वहिवाटीत असली तरी एका व्यक्तीने परस्पर शेतीच्या उताऱ्यावर मोठ्या स्वरूपाच्या नोंदी घेत परस्पर विमा काढून घेतला आहे.

या शेतात आजही भुईमूग, कपाशीसह इतर पिके घेतली जात असून, गेल्या अनेक वर्षांपासून पीकविमा काढला जात आहे. यंदा पीकविम्याचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केला आहे.

या अनुषंगाने लाभ मिळावा, अशी मागणी आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

Complainant farmers present in private farm regarding crop insurance.
Dhule News: पीकविम्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवा; शिवसेना ठाकरे गटाची राज्य शासनाकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.