Success Story : सोनगीरची पहिली कन्या चैतन्या पाटीलची नर्सिंग ऑफिसर पदाला गवसणी!

Chaitanya Patil
Chaitanya Patilesakal
Updated on

सोनगीर (जि. धुळे) : येथील चैतन्या सुनील पाटील हिची एमएनएस सैन्यदलात नर्सिंग ऑफिसरपदी नियुक्ती झाली. ती सैन्यदलात नोकरी मिळवणारी येथील पहिली युवती ठरली.

चैतन्या पाटील हिने डी. फार्मसी केले असून सध्या ती बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. नवी दिल्ली येथे झालेल्या सीबीटी परीक्षेसह मौखिक व शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्याने तिची नर्सिंग ऑफिसरपदी नियुक्ती झाली.

चैतन्या म्हणाली, भारतीय सैन्य दलात सेवा फक्त मुलेच करू शकतात असे नेहमीच म्हटले जायचे. पण मी निर्धार केला की मी मुलगी असूनही सैन्य दलात जाऊन देशसेवा करणार. तसा प्रयत्न सुरू ठेवला. आणि मी यशस्वी झाल्याने मला खूप आनंद होत आहे. मुलींनी सैन्यदलात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

परीक्षा न देण्याचा घेतला निर्णय पण...

परीक्षेला जाण्यासाठी मला दिल्लीचे रेल्वे तिकीट मिळत नव्हते. म्हणून परीक्षा देण्याचे रद्द होण्याची शक्यता होती. परंतु, ऐनवेळी पाटील समाज अध्यक्ष संजय नारायण पाटील धावून आले. त्यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट मिळवून दिले. आणि मी दिल्लीच नव्हे तर परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट भारतीय सैन्य दलात पोचले.

या यशाबद्दल माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, जिल्हा परिषद सदस्य वैशाली चौधरी, गटनेते पंकज कदम, सरपंच रुखमाबाई ठाकरे यांनी अभिनंदन केले. ती येथील स्वप्नपूर्ती कॉम्प्युटर सेंटरचे संचालक सुनील भामरे यांची कन्या आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Chaitanya Patil
Eknath Shinde : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ; विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष

देशसेवेच्या आवडीने चैतन्या हिने अभ्यासासोबत शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष केंद्रित केले. त्यामुळे महाविद्यालयात तिने एनसीसीत प्रवेश घेतला.

नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने कसून सराव केला. तिचे वडील सुनील भामरे हे संगणक क्लास चालवतात. चैतन्याला लहान भाऊ व मोठी बहीण आहे. बहीण एमएस्सीला असून भाऊ दहावीला नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहे

Chaitanya Patil
Nashik News: येवला पोलिस निरीक्षक मथुरे यांची चौकशी; फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()