Dhule News : तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना फटका

Chinoda: Cultivated area in Chinoda area lying fallow due to lack of rain.
Chinoda: Cultivated area in Chinoda area lying fallow due to lack of rain.esakal
Updated on

Nandurbar News : जून महिना संपत आला तरी तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या असून आजअखेर पर्यंत फक्त दोन हजार ४४२ हेक्टरवर म्हणजेच जवळपास फक्त दहा टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत.

पाऊस लांबल्यास त्याचा विपरीत परिणाम विविध पिकांचा विशेषतः कापसाच्या लागवडीवर होणार असून यंदा कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता असून कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.(Sowing in Taloda taluka failed Dryland farmers in Cotton are likely to decline Dhule News)

तळोदा तालुक्यात गेल्या चार ते पाच महिन्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सर्व दुःख बाजूला सारून यंदा खरिपात चांगला पाऊस पडेल या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारी केली.

तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करीत विविध पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन पूर्ण केले आहे. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाचा आता पता नसून पाऊस अक्षरशः पूर्णपणे क्वांरटाईन झाला आहे.

त्यामुळे पावसाअभावी शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी पुढे येत नसून यामुळे पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. २२ जून पर्यंत तालुक्यात फक्त २४४२ हेक्टरवर पिकांची लागवड झाली आहे. त्यात कापूस, केळी, ऊस व पपई या पिकांचाच वाटा आहे.

Chinoda: Cultivated area in Chinoda area lying fallow due to lack of rain.
Jalgaon News : चाळीसगावातील वारकरी विठूरायाच्या चरणी; पंढरपूर वारीतून ३ हजार भाविकांचे दर्शन

सोयाबीन, तूर, ज्वारीची पेरणीच नाही

तालुक्यात पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी एक हजार ११८ हेक्टरवर कापूस तर १० हेक्टरवर शेतकऱ्यांनी मका लावला आहे. तसेच केळी ३२८ हेक्टर, पपई १५३ हेक्टर, ऊस ७४० हेक्टर, मिरची ८२ हेक्टर तर भाजीपाला ११ हेक्टरवर आजपर्यंत लावण्यात आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लावण्यात येणारे सोयाबीन, ज्वारी, तांदूळ, तूर व उडीद आदी पिकांची तर पावसाअभावी शून्य टक्के पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे तळोदा तालुक्यात आता अगदी कमी प्रमाणात लावण्यात येणाऱ्या भुईमूग, सूर्यफूल, बाजरी आदी पिकांची देखील शून्य टक्के पेरणी झाली आहे.

इकडे आड व तिकडे विहीर

तळोदा तालुक्यात पावसाने फक्त नावालाच हजेरी लावली आहे. बहुतांशी शेतकरी पेरणी योग्य पाऊस झाल्यावर पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देतात. मात्र आता पावसाने जास्त ओढ दिली तर पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्यता आहे. तसेच, आता पेरणी केली आणि त्यानंतर पाऊस लांबला तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे इकडे आड व तिकडे विहीर अशी विचित्र परिस्थिती यानिमित्ताने निर्माण होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chinoda: Cultivated area in Chinoda area lying fallow due to lack of rain.
Jalgaon News : गुगलवर 30 हजार भाविकांनी शोधले मंगळग्रह मंदिर

-सध्याच्या परिस्थितीत शेतकरी ‘वेट ॲन्ड वॉच’ चा भूमिकेत असून बी-बियाणे घेण्यासाठी ते पुढे धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

-गेल्या दोन-तीन हंगामात शेतकऱ्यांची जास्त पसंती मिळालेल्या कापसाच्या लागवडीत यंदा पावसाअभावी घट होण्याची चिन्हे आहेत.

-पाऊस लांबल्याने कोरडवाहू व छोट्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

२२ जूनपर्यंतची खरिपाची आकडेवारी.

(आकडेवारी हेक्टरमध्ये)

पीक लागवड टक्केवारी

मका १० ०.८०

कापूस १११८ १२

Chinoda: Cultivated area in Chinoda area lying fallow due to lack of rain.
Jalgaon News : वरखेडी गुरांच्या बाजारात विक्रमी उत्पन्न; योजनांची यशस्वी अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.