Dhule News : वाहतूक बंद असल्याने ‘एसटी’ला कोटीवधीचा फटका

st bus
st bus sakal
Updated on

Dhule News : सारंगखेडा येथील पुलाला भगदाड पडल्याने येथील पुलावरून अवजड वाहतूक दीड महिन्यापूर्वी बंद करण्यात आली होती.

मात्र परवानगी नसताना देखील अनेक अवजड वाहने या पुलावरून प्रवास करीत असल्याने एस टी महामंडळाच्या बसेसला देखील या पुलावरून वाहतूक करण्याची परवानगी देण्यात यावे याबाबत महामंडळाकडून पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. (ST bus loss crore due to Transportation closed dhule news )

एसटीची वाहतूक बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसून प्रवास करावा लागत आहे. सारंगखेडा येथील पुलाला भगदाड पडल्याने दीड महिन्यापूर्वी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी हलके वाहन आणि दुचाकीला वाहतुकीस परवानगी देण्यात आली.

मात्र या वाहनासह अवजड वाहने देखील या पुलावरून सर्रास वाहतूक करीत आहे. असे असताना केवळ एसटी महामंडळाच्या बसेस परवानगी का नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.

दीड महिन्यापासून या मार्गावरुन वाहतूक बंद असल्याने दोंडाईचा शहादा अक्कलकुवा या आगाराचे किमान दोन कोटींचे नुकसान झाले असून दिवाळी असून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते.

st bus
Dhule Crime News : गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल एलसीबीकडून जप्त

बसेसला या दिवसात उत्पन्न दुप्पट होत असल्याने आधीच तिन्ही आगाराचे दोन कोटीवर नुकसान झाले असून दिवाळी असूनही अद्याप बसेसला परवानगी न मिळाल्याने अक्कलकुवा शहादा व दोंडाईचा या आगाराला दररोज एक ते दीड लाखाचा फटका बसत आहे.

याविषयी आगार प्रमुखांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी अनंत शेलार यांच्या वेळोवेळी संपर्क करूनही अद्याप परवानगी नसल्यानें आगाराच्या नुकसानीस प्रवाशांची डोकेदुखी वाढली असून ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

''दोंडाईचा आगाराचे दर दिवसाला किमान एक लाखाचा फटका बसत असून दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत असून तत्काळ बसेस सुरू कराव्यात व प्रवाशांची होणारी गैरसाय दूर करावी.''- किशोर पाटील, दोंडाईचा आगार प्रमुख

st bus
Dhule News : अल्पसंख्याक भागातील कामांसाठी पावणेदोन कोटी मंजूर : आमदार शाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.