Standing Committee : थातुरमातुर उत्तरांनी ‘स्थायी समिती’ वैतागली; शिस्तभंगाचा इशारा

Standing Committee was annoyed by answers about action taken on  complaints and problems of members dhule news
Standing Committee was annoyed by answers about action taken on complaints and problems of members dhule newsesakal
Updated on

धुळे : मागील साप्ताहिक सभेत सदस्यांनी मांडलेल्या तक्रारी, समस्यांवर काय कार्यवाही झाली ते सांगा, असे निर्देश स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर विविध विषयांवर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे थातुरमातुर उत्तरांची ढकलगाडी सुरू केली. (Standing Committee was annoyed by answers about action taken on complaints and problems of members dhule news)

अधिकाऱ्यांची ही उत्तरे असमाधानकारक असल्याचे सभापतींसह सदस्य म्हणाले. प्रशासन सक्रिय असते तर तेच ते प्रश्‍न पुन्हा आले नसते, कोणत्याच विषयावर गांभीर्य नाही, काहीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करेल, असा इशारा सभापतींनी दिला. दरम्यान, स्वच्छता निरीक्षक, मुकादम, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती श्रीमती कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभीच सभापती श्रीमती कुलेवार यांनी अधिकाऱ्यांच्या हजेरीबाबत निर्देश देत मागील सभेत उपस्थित झालेल्या विविध विषयांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही झाली ते सांगा, असे निर्देश दिले.

यात सदस्य हर्षकुमार रेलन यांचा उघड्यावर मांसविक्री, नाजियाबानो पठाण यांनी उपस्थित केलेल्या नवरंग जलकुंभावरील पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न, नरेश चौधरी यांनी उपस्थित केलेला प्रभागातील सार्वजनिक शौचालय, एलईडी पथदीप, जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची बदली आदी विविध विषयांवर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे थातुरमातुर उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Standing Committee was annoyed by answers about action taken on  complaints and problems of members dhule news
Nashik News : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदेच्या कालव्यात कोसळली; 14 तासांपासून जवान बेपत्ता

अधिकाऱ्यांची ही उत्तरे ऐकून सभापतींसह काही सदस्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे असमाधानकारक असल्याचे नमूद केले. दरम्यान, कोणत्याच विषयावर काहीच गांभीर्य दाखविले जात नाही. त्यामुळे संबंधितांवर यापुढे शिस्तभंगाची कारवाई करून टाकेन, असा इशारा सभापती श्रीमती कुलेवार यांनी दिला.

ॲक्शन नसेल तर...

सदस्या कल्याणी अंपळकर यांनी प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्‍न मांडला. निम्मे कर्मचारी कामावर नसतात. स्वच्छता निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांची बदली करा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. मात्र, कार्यवाही होत नाही. त्यामुळे ॲक्शन होणार नसेल तर तसे सांगा, असे त्या उद्विग्नपणे सांगितले. त्यावर सभापती श्रीमती कुलेवार यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा, त्याशिवाय काहीही होणार नाही, असे सांगितले.

सेटलमेंट झाली आहे का, अशी टिप्पणीही त्यांनी केली. सभेला अधिकारी येणार नसतील तर तुम्हीही येऊ नका, मीही येणार नाही, असेही त्यांनी अतिरिक्त आयुक्त कापडणीस यांना उद्देशून सांगितले. दरम्यान, सदस्य साबीर शेठ, नाजियाबानो पठाण यांनी रमजानमध्ये सुरळीत पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत उपाययोजना व्हावी, अशी मागणी केली.

Standing Committee was annoyed by answers about action taken on  complaints and problems of members dhule news
Salokha Yojana | ‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

गोट्या खेळायला येतो का?सदस्य सुनील बैसाणे म्हणाले, की की विविध विषयांच्या कार्यवाहीबाबत सभापतींनीकडून झालेली विचारणा चांगला प्रयत्न आहे. मात्र, प्रशासनाला तेच नको आहे. सभेत आम्ही विविध प्रश्‍न मांडतो. त्यामुळे सभा जास्त वेळ चालते तेही अधिकाऱ्यांना आवडत नसेल तर आम्ही इथे काय गोट्या खेळायला येतो का, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

संभाजी गार्डन ‘बीओटी’वर

शहरातील संभाजी गार्डन मे. गौरव मजूर सहकारी सोसायटी लि. निशाने (जि. धुळे) या संस्थेला बीओटी तत्त्वावर चालविण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. तीन वर्षांसाठी एकूण आठ लाख नऊ हजार ९९७ रुपयांची त्यांची निविदा होती. तसेच आई एकवीरादेवी मंदिर परिसरातील यात्रोत्सवादरम्यान यात्रा फी वसुलीसाठी जाहीर लिलावासही मंजुरी देण्यात आली.

...अन्यथा उपोषण

हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांना अवास्तव मालमत्ता कर आकारणी झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवासी आता रस्ते, गटारींचे प्रश्‍न विचारत नाहीत, घरपट्टीबाबत विचारणा करतात. हा प्रश्‍न सुटला नाही तर २७ मार्चपासून हद्दवाढ भागातील सर्व नगरसेवक, नागरिकांसह उपोषणाला बसू, असा इशारा सदस्य किरण अहिरराव यांनी दिला.

Standing Committee was annoyed by answers about action taken on  complaints and problems of members dhule news
Police Recruitment : अल्पसंख्याकांसाठी 'या' तारखेला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.