धुळे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध मंजूर विकासकामांना गती द्यावी.
ज्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्या कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्यावे, तसेच वितरित झालेला निधी विहित मुदतीत खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यंत्रणेला दिल्या. (Start approved works of District Annual immediately Collector Abhinav Goyal Dhule News)
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी (ता. २०) जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी गोयल अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीस धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. स॔भाजी भामरे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर, पालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की शासनाने २०२३-२४ करिता प्रत्येक विभागास देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेस अनुसरून बीडीएस प्रणालीवर ७० टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे.
उपलब्ध निधी खर्च झाल्यानंतर उर्वरित ३० टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या विभागांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अशा विभागांनी त्वरित निविदाप्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्यावा.
प्रस्ताव त्वरित सादर करा
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करून तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत. प्रत्येक विभागाने खरेदीप्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करावी.
ज्या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याची मागणी त्वरित करावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून यंत्रणांनी दर्जेदार विकासकामे होतील यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी.
कृषी विभाग, जलसंधारण विभाग, मत्स्यव्यवसाय विकास, क्रीडा विभागाने मंजूर कामे त्वरित सुरू करावीत. आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाने औषधे खरेदीची कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध निधी व खर्चाची माहिती दिली. बैठकीत चालू वर्षाचा मंजूर निधी व झालेला खर्च यावर सविस्तर चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.