नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला तोड नसल्यामुळे कोणीही ऊठसूट कितीही काहीही टीकाटिप्पणी, आरोप-प्रत्यारोप केले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी स्पष्टोक्ती बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख पर्णिता पोंक्षे यांनी केली.
नगर परिषदेच्या सभागृहात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मंगळवारपासून सहा दिवस पोंक्षे नंदुरबार जिल्ह्याच्या दौरावर आहेत. नवापूर, तळोदा, धडगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. (Statement by Shiv Sena District Liaison Chief pranit ponkshe Accusations will not affect Shinde group Nandurbar political news)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
या वेळी पोंक्षे म्हणाल्या, की महिलांनी त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत राहणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने शक्ती कायदा पारित केला आहे. या कायद्याचा वापर महिलांना करता आला पाहिजे. जोपर्यंत पीडित समस्याग्रस्त महिला तक्रार करत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहू शकत नाही.
बैठकीच्या सुरवातीला नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पोंक्षे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बैठकीत जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. या वेळी पंचायत समिती सभापती माया माळसे, उपसभापती शीतल परदेशी, जिल्हा परिषद सदस्या शकुंतला शिंत्रे, जागृती मोरे, नगरसेविका सोनिया राजपूत, भारती राजपूत, मनीषा वळवी, ज्योती योगेश राजपूत, ज्योती पाटील, कुरेशी फहमिदाबानो रियाज, श्रीमती मेमन मेहरुंनिसा अ. गनी, पंचायत समिती सदस्या बायजाबाई भिल, बेगाबाई भिल, दीपमाला पाडवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.