Dhule News : सोनगीर ग्रामीण रुग्णालय 50 खाटांचे करणार : आमदार कुणाल पाटील

MLA Kunal Patil while inspecting a rural hospital. Neighboring District Surgeon Dr. Datta Degavkar and villagers.
MLA Kunal Patil while inspecting a rural hospital. Neighboring District Surgeon Dr. Datta Degavkar and villagers.esakal
Updated on

Dhule News : येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ३० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय ५० खाटांचे करण्यात येईल, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. (statement of MLA kunal patil rural hospital will have 50 beds dhule news )

रुग्णांवर उपचार करताना कोणीही दुर्लक्ष किंवा चालढकल करू नये, असे आमदार पाटील यांनी बजावले. त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी व रुग्णांची विचारपूस करीत ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतल्या.

ग्रामस्थांनी वैद्यकीय सुविधा, उपचार, औषधी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता, कर्मचारी स्थानिक ठिकाणी न राहणे आदी समस्या मांडल्या. एक महिन्याच्या आत ग्रामीण रुग्णालयातील समस्या सुटल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांची बैठक झाली. माजी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ खाँ पठाण, प्रमोद धनगर, हसनखाँ पठाण यांनी रुग्णालयाच्या समस्या मांडल्या. आमदार पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील सर्व प्रकारच्या सेवा क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून, एक महिन्यात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

MLA Kunal Patil while inspecting a rural hospital. Neighboring District Surgeon Dr. Datta Degavkar and villagers.
Dhule News : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातर्फे फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने

डॉ. महेश भडागे, डॉ. स्वप्नील पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, संचालक एन. डी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार निकवाडे, डॉ. प्रफुल्ल पगारे, डॉ. निशिकांत पाटील, डॉ. वाय. के. परदेशी, माजी सरपंच केदारेश्‍वर मोरे, माजी उपसरपंच प्रकाश गुजर, ग्रामपंचायत सदस्य इरफान कुरेशी, मुन्ना शेख, शफियोद्दीन पठाण, पिंटू भिल, अशरफ पठाण, मुन्ना शेख, नंदू धनगर, आरोग्यसेवक गोकुळ राजपूत, राजू पाडवी, बापू पाटील, अविनाश खैरनार, सुनील माळी, भीमा मोरे, किशोर पावनकर, अमित बागूल आदी उपस्थित होते.

समस्या सोडविणार : डॉ. देगावकर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, की एक्स-रे तंत्रज्ञ, वैद्यकीय अधीक्षक, फार्मसिस्ट ही पदे भरली जातील किंवा उपलब्धा असलेल्यांना अतिरिक्त काम देऊ. तीन महिन्यांचा औषधसाठा उपलब्ध आहे.

१५ ते २० टक्के रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे योग्य, पण त्यापेक्षा अधिक नको. जिल्हा रुग्णालय जवळ असल्याने येथे ट्रॉमा सेंटर होणे अशक्य आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासाठी आदेश देणार असून, सूचनापेटी व उपस्थित कर्मचाऱ्यांचा फलक मोबाईल क्रमांकासह लावण्यात येईल.

MLA Kunal Patil while inspecting a rural hospital. Neighboring District Surgeon Dr. Datta Degavkar and villagers.
Dhule News : शिरपूरला दीड शतकाची परंपरा असलेल्या वहनोत्सवाला आजपासून सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.